Navi Mumbai : जेसीबीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू 
नवी मुंबई

Navi Mumbai : जेसीबीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

ऐरोली सेक्टर-१४ येथे जेसीबीच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी न्यू होरायझन स्कूलसमोर घडली. या घटनेमुळे ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रबाळे पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-१४ येथे जेसीबीच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी न्यू होरायझन स्कूलसमोर घडली. या घटनेमुळे ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रबाळे पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांमध्ये दिग्विजय बाबासाहेब दिंडे (१७), रा. ऐरोली सेक्टर-४ आणि हर्षद सावर्डेकर (१८), रा. ऐरोली सेक्टर-८ यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद आणि दिग्विजय हे दोघेही शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ऐरोली सेक्टर-१४ येथून बजाज अवेंजर मोटारसायकलवरून ऐरोली सेक्टर-१० च्या दिशेने जात होते. त्याचवेळी आरोपी चालक हनुमंत मारुती शिंदे (२९) हा त्याच्या ताब्यातील जेसीबी मशीन घेऊन न्यू होरायझन स्कूलसमोरून रस्ता ओलांडत होता.

यावेळी मोटारसायकलला जेसीबीची जोरदार धडक बसली. या धडकेचा वेग इतका भीषण होता की मोटारसायकलवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला

घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि पोलीस निरीक्षक शाम बनसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर रबाळे पोलिसांनी आरोपी जेसीबी चालक हनुमंत शिंदे याला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक होनमाने करत आहेत.

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला