नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

बहुप्रतीक्षित ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ (NMIA) पूर्णपणे कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : बहुप्रतीक्षित ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ (NMIA) पूर्णपणे कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्‌घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरोड्रोम परवाना दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.ने ३० सप्टेंबर रोजी ही माहिती दिली आहे.

डीजीसीए महासंचालक फैज अहमद किडवाई यांनी हा एअरोड्रोम परवाना सुपूर्द केला. सर्व सुरक्षा आणि नियामक मानकांची पूर्तता झाल्यानंतर विमानतळाला ऑपरेशन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. NMIAL ने निवेदनात म्हटले आहे की, कडक सुरक्षा आणि नियामक निकष पूर्ण केल्यानंतर दिलेला हा परवाना ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्वअट आहे. इंडिगो आणि आकासा एअरच्या पाठोपाठ एअर इंडियानेही नवीन विमानतळावरून व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस, जी एअर इंडियाची कमी भाड्याची वाहक आहे, सुरुवातीच्या टप्प्यात १५ भारतीय शहरांना जोडणारी २० दैनंदिन उड्डाणे चालवेल. २०२६ च्या मध्यापर्यंत ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह ५५ दैनंदिन उड्डाणे वाढवण्याचे नियोजन आहे. हिवाळ्यापर्यंत दैनंदिन उड्डाणांची संख्या ६० पर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

-विमानतळाची क्षमता

अदानी समूह आणि सिडको पाच टप्प्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करत आहेत. पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना (MPPA) सामावून घेण्याची आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता असेल. नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे विमानतळ असेल आणि ते शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक प्रवेशद्वार प्रदान करेल.

परवाना प्रक्रियेतील अडथळे दूर

-अदानी विमानतळ होल्डिंग आणि सिडको यांच्या संयुक्त मालकीच्या NMIA ने फेब्रुवारीच्या अखेरीस एअरोड्रोम परवान्यासाठी अर्ज केला होता.

-डीजीसीएने विमानतळाभोवती सुमारे २० अडथळ्यांची नोंद केली होती.

-चाचणी उड्डाणांदरम्यान नियामकांनी परिचालन पद्धतींमध्ये काही बदल सुचवले.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी