नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज; 'या' तारखेपासून सुरू होणार उड्डाण, जाणून घ्या सविस्तर माहिती

दीर्घकालीन प्रतिक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी उड्डाण सेवेला अखेर सुरूवात होणार आहे. प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ आता सज्ज झाले आहे. ही सेवा नेमकी कधीपासून आणि कोणत्या ठिकाणांसाठी सुरू होणार आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नेहा जाधव - तांबे

दीर्घकालीन प्रतिक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी उड्डाण सेवेला अखेर सुरूवात होणार आहे. प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ आता सज्ज झाले आहे. ही सेवा नेमकी कधीपासून आणि कोणत्या ठिकाणांसाठी सुरू होणार आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अकासा एअरच्या अधिकृत माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२५ पासून नवी मुंबई विमानतळावरून त्यांच्या प्रवासी उड्डाणांला प्रारंभ होणार आहे. प्रथम टप्प्यात नवी मुंबई विमानतळावरून दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबाद या चार प्रमुख शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत.

वेळापत्रक आणि उड्डाणांची माहिती

दिल्ली -

पहिल्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी दोन फ्लाइट्स उड्डाण करतील. क्यूपी १८३१ दिल्लीहून सकाळी ५.२५ वाजता निघेल आणि नवी मुंबईत ८.१० वाजता उतरेल. परतीची फ्लाइट क्यूपी १८३२ नवी मुंबईहूनन सकाळी ८.५० वाजता निघेल आणि दिल्ली येथे ११.१५ वाजता पोहोचेल.

दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर पासून दैनंदिन फ्लाइट्स सुरू होतील. दिल्ली-NMIA फ्लाइट क्यूपी १८३१ सकाळी ६.३० वाजता निघेल, NMIA येथे ८.५० वाजता पोहोचेल. क्यूपी १८३२ ही परतीची फ्लाइट १०.५५ वाजता NMIA हून निघेल आणि दिल्ली येथे १३.१५ वाजता पोहोचेल.

गोवा (मोपा विमानतळ) -

२५ डिसेंबर रोजी क्यूपी १९२८ गोव्याहून १५.४० वाजता उड्डाण करेल आणि NMIA येथे १७.०० वाजता पोहोचेल. तर, परतीची फ्लाइट क्यूपी १९२७ NMIA हून १७.४० वाजता निघेल आणि गोव्यात १८.५५ वाजता उतरेल. ही सेवा बुधवार सोडून इतर दिवशी सुरू असेल.

कोची -

ही सेवा २६ डिसेंबरपासून सुरू होईल. सुरुवातीला केवळ शुक्रवार आणि शनिवारीच हे सेवा देण्यात येत आहे. क्यूपी १९१४ कोचीहून १०.५० वाजता निघेल, NMIA येथे १२.४५ वाजता पोहोचेल. फ्लाइट क्यूपी १९१५ ही परतीची १३.३० वाजता NMIA येथून निघेल, १५.३० वाजता कोची येथे पोहोचेल. २८ डिसेंबरपासून मंगळवार, बुधवार आणि रविवारसाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू होतील.

अहमदाबाद -

ही सेवा ३१ डिसेंबरपासून सुरू होईल, सुरुवातीला केवळ बुधवारी फ्लाइट क्यूपी १९१६ NMIA हून संध्याकाळी १६.४० वाजता निघेल आणि अहमदाबाद येथे १८.५० वाजता पोहोचेल.

तिकीट बुकिंग आणि प्रवाशांसाठी सुविधा

अकासा एअर प्रवाशांसाठी अकासाच्या वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा अधिकृत ट्रॅव्हल एजंटद्वारे तिकिटे बुक करता येतील. बुकिंग प्रक्रिया जलद, सोपी आणि सुरक्षित ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना ऑनलाईन चेक-इन, सीट निवड, बॅगेज सुविधा आणि इतर आवश्यक सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब