नवी मुंबई

नवी मुंबई : पनवेलमध्ये मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता प्रसूत झाल्यानंतर घटना उघडकीस

पनवेलच्या आपटा गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबध निर्माण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे गरोदर राहिलेली पीडित मुलगी प्रसूत झाली आहे. घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : पनवेलच्या आपटा गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबध निर्माण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे गरोदर राहिलेली पीडित मुलगी प्रसूत झाली आहे. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या घटनेतील पीडित मुलगी पनवेल येथे राहण्यास असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा १७ वर्षीय मुलगा हा देखील पनवेलमध्ये राहण्यास आहे. पीडित मुलगी सप्टेंबर २०२३ मध्ये नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलाने पीडित मुलीसोबत मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबध निर्माण केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली, मात्र याबाबतची माहिती पीडित मुलीने आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवली.

गत आठवड्यात पीडित मुलीच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर तिला कुटुंबीयांनी रुग्णालायत दाखल केले. त्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले, त्यानंतर पीडित मुलगी प्रसूत देखील झाली. पीडित मुलीकडे याबाबत विचारपूस केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाची माहिती तिने दिली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी