Navi Mumbai : सायकलवरून आयुक्त कैलास शिंदे यांचा पाहणी दौरा (Photo-X/@NMMConline)
नवी मुंबई

Navi Mumbai : सायकलवरून आयुक्त कैलास शिंदे यांचा पाहणी दौरा

नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे उत्तम सायकलपटू आहेत. त्यांनी शनिवारी नवी मुंबई पाहणी दौरा चक्क सायकलवरून केला.

Swapnil S

नवी मुंबई: नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे उत्तम सायकलपटू आहेत. त्यांनी शनिवारी नवी मुंबई पाहणी दौरा चक्क सायकलवरून केला. ते स्वतः खेळाडू असल्याने त्यांना सहज शक्य झाले, मात्र अनेक अधिकाऱ्यांची दमछाक झाल्याचे चित्र दिसून येत होते. सायकलवर पाहणी दौरा केल्याने बारीकसारीक बाबींकडे त्यांनी लक्ष दिले.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत बेलापूर व नेरूळ अधिकाऱ्यांसोबत विभागात सायकलद्वारे पाहणी दौरा केला.

त्यांच्यासमवेत शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ १ उपायुक्त सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत नेरकर या अधिकाऱ्यांनीही सायकल चालवत पाहणी दौऱ्यात सहभाग घेतला.

नेरूळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पाहणीला सुरुवात करीत शिरवणे, सारसोळे, कुकशेत, करावे, ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर, सीवूड रेल्वेवरील उड्डाणपूल, पारसिक हिल, इन्कम टॅक्स कॉलनी आदी भागातील स्वच्छता, शौचालये, उद्याने, मार्केट, सायकल ट्रॅक, पम्प हाऊस अशा विविध बाबींची त्यांनी सायकलवर पाहणी करीत आवश्यक त्या ठिकाणी थांबत संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणांविषयक दुरुस्तीबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या.

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार

पोलिसांचा डोंबिवलीत 'सर्जिकल स्ट्राइक'; पलावा सिटीतून २५ आफ्रिकन नागरिक ताब्यात

मुंबईत चिनी बनावटीची शस्त्रे जप्त; तीन तस्करांना अटक