नवी मुंबई

Navi Mumbai : क्रिप्टो-शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; कर्ज सल्लागाराला ७२ लाखांचा गंडा, ५ अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

आरोपींनी विश्वास संपादन करून पीडित व्यक्तीला, मे २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध वेबसाइट्सच्या माध्यमातून ठराविक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करायला भाग पाडले आणि...

किशोरी घायवट-उबाळे

ऑनलाइन गुंतवणुकीत फसवणूक होण्याच्या घटना सातत्याने घडत असताना नवी मुंबईतून सायबर फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५६ वर्षांच्या कर्ज सल्लागाराला (loan consultant) क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ७२.७० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पीडित व्यक्ती बेलापूर परिसरातील रहिवासी असून, काही अज्ञात व्यक्तींनी त्याला USDT (Tether) या क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक केली तर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. आरोपींनी विश्वास संपादन करून पीडित व्यक्तीला, मे २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध वेबसाइट्सच्या माध्यमातून ठराविक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करायला भाग पाडले. मात्र काही काळानंतर आरोपींनी सर्व संपर्क तोडला, असे पोलिसांनी सांगितले.

अज्ञात व्यक्ती आणि वेब प्लॅटफॉर्मविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, गुंतवणूक प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करण्यात आल्याचे लक्षात येताच पीडिताने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पाच अज्ञात व्यक्ती आणि तीन वेब प्लॅटफॉर्मविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली HR मॅनेजरला ३६ लाखांचा फटका

माहितीनुसार, नवी मुंबईतच आणखी एका प्रकरणात HR मॅनेजरला ३६.७४ लाख रुपयांचा ऑनलाइन गुंतवणूक फसवणुकीचा फटका बसला आहे. एका महिलेने स्वतःला SEBI-नोंदणीकृत संस्थेची प्रतिनिधी असल्याचे सांगून पीडिताला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले. सुरुवातीला ५० हजार रुपयांचा नफा दाखवून ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान मोठ्या रकमेची गुंतवणूक करून घेण्यात आली. मात्र, नफा काढता न आल्याने ही फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट ग्राहक बनून बँक मॅनेजरची १९.८६ लाखांची फसवणूक

ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एका बँक मॅनेजरला १९.८६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. आरोपीने स्वतःला एका नामांकित बांधकाम कंपनीचा कर्मचारी म्हणून ओळख देत २ कोटी रुपयांच्या एफडीसाठी मदत मागितली. बनावट ई-मेल आणि लेटरहेड पाठवून RTGS व्यवहार करून घेतल्यानंतर फसवणूक उघड झाली. नंतर खरी व्यक्ती बँकेत आल्यावर फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणातही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनांमुळे ऑनलाइन गुंतवणूक, शेअर ट्रेडिंग आणि आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई