नवी मुंबई

Navi Mumbai : धुलिवंदननिमित्त मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; कधी बंद, कधी सुरू? जाणून घ्या माहिती

सिडकोने इन्स्टाग्रामवर दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बेलापूर सीबीडी ते पेंधरदरम्यान धावणारी मेट्रो सेवा सकाळच्या सत्रात बंद राहील. मेट्रो दुपारी २ वाजल्यापासून...

किशोरी घायवट-उबाळे

सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (CIDCO) लिमिटेडने धुलिवंदन सणानिमित्त ३ मार्च रोजी नवी मुंबई मेट्रो लाईन १ च्या वेळापत्रकात तात्पुरता बदल जाहीर केला आहे.

सकाळच्या सत्रात मेट्रो बंद

सिडकोने इन्स्टाग्रामवर दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बेलापूर सीबीडी ते पेंधरदरम्यान धावणारी मेट्रो सेवा ३ मार्चला सकाळच्या सत्रात बंद राहील. मेट्रो दुपारी २ वाजल्यापासून सुरू होऊन रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील.

दुपारनंतर सेवा सुरू झाल्यानंतर गाड्या दर १५ मिनिटांच्या अंतराने धावतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

बेलापूर ते पेंधर महत्त्वाचा दुवा

नवी मुंबई मेट्रो लाईन १ ही बेलापूरच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टला तळोजा आणि पेंधरसारख्या निवासी व विकसित होत असलेल्या भागांशी जोडणारा महत्त्वाचा प्रवासी दुवा आहे. या मार्गावर दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. मात्र, धूलिवंदनाच्या दिवशी सकाळच्या वेळेत प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असते. तसेच सणानिमित्त आवश्यक नियोजनाच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने सकाळची मेट्रो सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी वाहनांने प्रवास करावा लागणार आहे.

प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती सिडकोने केली आहे. त्यानंतर नियमित सेवा पुन्हा सुरू होईल.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण