नवी मुंबई महापालिका संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

Navi Mumbai : महापालिका पदभरती निकालाचा मार्ग मोकळा; संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर

नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड मधील ३० संवर्गातील ६६८ पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर मोकळा झाला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड मधील ३० संवर्गातील ६६८ पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर मोकळा झाला आहे. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबरला उमेदवारांचे स्कोअर कार्ड पालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

कर्मचाऱ्यांना संरक्षण

महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या ४७७ कंत्राटी/करार पद्धतीतील कर्मचाऱ्यांच्या सेवेला कोणतीही बाधा न आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे वगळून केवळ उर्वरित उपलब्ध रिक्त पदांवरच नवीन उमेदवारांना सरळसेवेने नियुक्ती दिली जाईल. न्यायालयाने जाहिरात व च्या शुद्धिपत्रकानुसार झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास महापालिकेला परवानगी दिली आहे.

६६८ पदांसाठी जुलै २०२५ मध्ये झालेल्या ऑनलाईन परीक्षेला ६८,१४९ उमेदवार उपस्थित होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये निकालाला अंतरिम स्थगिती दिली होती. आता न्यायालयाच्या ताज्या आदेशानुसार ११ सप्टेंबरला स्कोअरकार्ड प्रसिद्ध होत असून प्रलंबित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर उर्वरित पदांवरील नेमणुकीचा निर्णय घेतला जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाणे कोस्टल रोडमुळे ६८० कांदळवनांना धोका; नॅटकनेक्ट फाऊंडेशनचा पुनर्विचाराचा इशारा

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

आंबा-काजू बागांवर कीड-रोगांचा धोका; ढगाळ हवामानामुळे शेतकरी त्रस्त

चेंबूर, दादरवरून थेट दक्षिण मुंबईत; सायन सर्कलजवळील पुलाला दोन अतिरिक्त मार्गिका, १३० कोटींचा प्रकल्प; डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण होणार