नवी मुंबईत उभारणार १ लाख प्रेक्षक क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम 
नवी मुंबई

नवी मुंबईत उभारणार १ लाख प्रेक्षक क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम

महाराष्ट्राला जागतिक क्रीडा क्षेत्रात अधिक मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राला जागतिक क्रीडा क्षेत्रात अधिक मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याची योजना पुढे नेण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या मोठ्या प्रकल्पासाठी पुढील कामाची दिशा ठरवण्यासाठी नुकतीच सविस्तर चर्चा केली. उरण येथे हे स्टेडियम बांधण्यात येईल, असे समजते.

प्रस्तावित स्टेडियममध्ये सुमारे १ लाख प्रेक्षक बसू शकतील आणि ते जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक असेल, अशी कल्पना आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे स्टेडियम उभारण्याचा उद्देश आहे. यामुळे क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, प्रेक्षकांचा अनुभव आणि शहराचा एकत्रित विकास यांमध्ये नवे मापदंड निर्माण होतील. याबाबत बोलताना अजिंक्य नाईक म्हणाले, “हा उपक्रम महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुंबई महानगर प्रदेशात १ लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारल्यामुळे मुंबईतील क्रिकेटला मोठी चालना मिळेल आणि महाराष्ट्राची जागतिक क्रीडा नकाशावर ठाम ओळख निर्माण होईल. या दर्जेदार सुविधेमुळे खेळाडूंच्या विकासासाठी मोठ्या संधी निर्माण होतील, नव्या खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळेल आणि सर्व स्तरांवर क्रिकेटची प्रगती अधिक चांगली होईल.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या उपक्रमातून क्रीडाविकास आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याकडे असलेला राज्याचा पुढारलेला दृष्टिकोन दिसून येतो. हे स्टेडियम क्रीडा पर्यटनाला चालना देईल, मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आकर्षित करेल आणि या प्रदेशाची जागतिक क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत करेल. राज्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून या स्टेडियमकडे पाहिले जात आहे.

कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार

Pune : "मॅडम, तुम्ही ड्रिंक केलीये का? नाही...मी दारू पिलीये"; मद्यधुंद महिला पोलिसाची उलट्या दिशेने ड्रायव्हिंग, Video व्हायरल होताच निलंबन

आरटीओंना नोटीस; HSRP बसविण्यात दिरंगाई भोवणार

डिजिटल फसवणूक; पीडितांना पूर्ण भरपाई - सुप्रीम कोर्ट

‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला CJP चा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आ‌वाहन