नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर

यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या ५२ इमारतींची नावे व तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

Krantee V. Kale

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील धोकादायक इमारतींचे २०२६-२०२७ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५०४ इमारती या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.

यात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-१’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५२ इमारती तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ ए’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या १०२ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे अशा ‘सी-२ बी’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या २९७ इमारती त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरुस्ती या ‘सी-३’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५३ इमारती, अशाप्रकारे एकूण ५०४ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे.

वेबसाईटवर यादी उपलब्ध

यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर 'विभाग' श्रेणीमध्ये 'अतिक्रमण विभाग' माहितीच्या सेक्शनमध्ये सामान्य माहिती या अंतर्गत अवलोकनासाठी सहज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही वरील लिंकवर क्लिक करूनही यादी पाहू शकता. या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी–१’ प्रवर्गामध्ये नमूद ५२ इमारतींची नावे व तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

सात धरणांमध्ये फक्त २० टक्के पाणीसाठा; पण राखीव पाणीसाठा मुंबईला तारणार, राज्य सरकारची मंजुरी

Mumbai : कसारा लोकल गेली मेल गाडीच्या फलाटावर; मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, तांत्रिक चुकीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ

Nashik : ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामाला मंजुरी; नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांकडून हिरवा कंदील

पाकिस्तानवर कधीही विश्वास ठेवू नका! अमेरिकेच्या पुढाकाराने इराणवर हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा

आईच्या संघर्षाला यशाचे पंख! उल्हासनगरच्या विशुध्दी-सम्यकची आकाशभरारी; विमानशास्त्रात घडवली नवी ओळख