उरण : उलवे येथील वहाळ पुलावर भीषण अपघात; अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी 
नवी मुंबई

उरण : उलवे येथील वहाळ पुलावर भीषण अपघात; कारमधील पाच जण गंभीर जखमी

बेलापूर-उरण फाटा मार्गावरील वहाळ पुलावर भरधाव कारने रस्त्याचा दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

Swapnil S

उरण : बेलापूर-उरण फाटा मार्गावरील वहाळ पुलावर भरधाव कारने रस्त्याचा दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालकासह कारमधील पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. टेम्पोचालकालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

टेम्पोचालक दिलीप विजय राठोड (२४) हे भारत बेंझ कंपनीचा टेम्पो घेऊन महापे एमआयडीसी येथून पेणच्या दिशेने जात होते. वहाळ पुलावर आले असता विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुभाजक ओलांडून टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमींना तातडीने

नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातातील जखमींमध्ये मोहम्मद हमजा रफीक अहमद शेख (१८), रेहान फैयाज खान (२१), सादीक युसुफ खान (२१), सैद शकील शेख (१७) आणि अनस शेख (१७) यांचा समावेश आहे. यापैकी मोहम्मद हमजा शेख, रेहान खान, झैद शेख आणि अनस शेख यांना गंभीर दुखापत झाली आहे.

टेम्पोचालक दिलीप राठोड यांच्या पायाला व गुडघ्याला मुक्का मार लागला आहे. त्यांच्या तक्रारीवरून उलवे पोलीस ठाण्यात कारचालक मोहम्मद हमजा शेख याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबई विमानतळावरून FLY91ने घेतली भरारी! 'या' ४ ठिकाणी थेट विमानसेवा; पहिल्या फ्लाइटचं खास स्वागत, VIDEO

Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूट

Mumbai : बेस्ट, रेल्वे, MMRDA पालिकेचे थकबाकीदार; पाण्याच्या बिलापोटी चार हजार कोटी थकवले

भटक्या श्वानांना आता कायमस्वरूपी निवारा; निर्बीजीकरणानंतर भटक्या कुत्र्यांचे ठिकाण बदलणार, प्रती श्वान १५५ रुपये खर्च करणार

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान