Navi Mumbai : कंटेनरच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यू; आई-वडील जखमी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

Navi Mumbai : कंटेनरच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यू; आई-वडील जखमी

कंटेनरने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

उरण: कंटेनरने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तिचे आई-वडीलही जखमी झाले असून, पनवेल शहर पोलीस ठाण्यात कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरीतील रहिवासी तेजस महादेव पाटील हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. शनिवारी दुपारी ते पत्नी वैष्णवी आणि मुलगी रितवी हिच्यासह स्कुटीवरून पेण (रावे) येथे राहणाऱ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी निघाले होते. सायंकाळी ५ वाजता रेल्वे ब्रिजवर भरधाव कंटेनरने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. यात पाटील कुटुंब रस्त्याच्या मधोमध पडले आणि थेट कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली आले. अपघातानंतर कंटेनर चालक कैलास अनंतलाल नाथ याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक नागरिकांनी त्याला जागीच अडवून धरले.

पाटील कुटुंबाला अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चिमुरडी रितवी हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी कंटेनर चालक कैलास नाथ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद शंकर लभाडे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा

Mira-Bhayandar : मेट्रो ब्रिजचा ब्लॉक कोसळून तरुण जखमी