नवी मुंबई

एनएमएसीच्या अतिक्रमण विराेधी पथकाला मारहाण

प्रतिनिधी

सीवूड्स सेक्टर-४२ मधील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकासोबत फळे व भाजीपाला विकणाऱ्या दाम्पत्याने धक्काबुक्की करुन त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. हिरालाल केसरवाणी व सीता केसरवाणी, असे या दाम्पत्याचे नाव असून एनआरआय पोलिसांनी या दाम्पत्यावर मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

महापालिकेच्या बेलापूर विभाग अधिकारी मिताली संचेती यांनी दिलेल्या सूचनेनुसार बेलापूर विभाग कार्यालयातील अतिक्रमण विराेधी पथकातील अधिकारी विनोद गर्जे हे पथकासह मंगळवारी सायंकाळी सीवूड्स सेक्टर-४२, ३६, ४८ मधील पदपथ व रस्त्यावर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी सबस स्टॉपजवळ एक दाम्पत्य पदपथ व रस्त्यावर फळे व भाजीपाला विकण्यासाठी बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अतिक्रमण पथकाने त्यांना त्याठिकाणी भाजी व फळे विक्री न करण्याबाबत समज दिली. मात्र फळ विक्रेता हिरालाल केसरवाणी याने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांची फळे व भाजीपाला जप्त केला. त्यावर हिरालाल केसरवाणी हा गर्जे यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी त्याची पत्नी सीता केसरवाणी हिनेसुद्धा कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा