नवी मुंबई

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘जंक्शन बॉक्स’

नवी मुंबई शहरात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मध्यवर्ती मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. याठिकाणी कायम वाहनांची वर्दळ असते.

प्रतिनिधी

नवी मुंबई शहरात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मध्यवर्ती मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. याठिकाणी कायम वाहनांची वर्दळ असते. वाहतुकीचे नियमन करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना वाहतूक पोलीस विभाग करत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत अशाच प्रकारची ‘जंक्शन बॉक्स’ ही एक अभिनव संकल्पना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राबविण्यात येत आहे.

प्रायोगिक तत्वावर हा जंक्शन बॉक्स तयार केला असून तेथील उपयोगिता लक्षात घेऊन शहरातील इतरही मुख्य व वर्दळीच्या चौकांमध्ये जंक्शन बॉक्स संकल्पना राबविण्याचे नियोजन असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली आहे. जंक्शन बॉक्सव्दारे वाहतुकीचा प्रवाह सुयोग्य रितीने नियंत्रित करण्यात येतो. वाहनांची वर्दळ असलेले व्यस्त चौक, क्रॉस रोड्स, टी-जंक्शन्स अशा ठिकाणी ते बसविले जातात. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या ट्रॅफिक सिग्नलसारख्या नियंत्रण व्यवस्था उपलब्ध असूनही वाहतूक सुरळीत राहत नाही व स्थिर वाहने अडथळा निर्माण करतात त्याठिकाणी बॉक्स जंक्शनचा मोठया प्रमाणावर उपयोग होतो. जंक्शन बॉक्समध्ये वाहनांना थांबण्यास प्रतिबंध असल्याने जंक्शन नेहमी मोकळे राहतात आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते.

मालेगावात जनआक्रोश! चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले; न्यायालयासमोर ठिय्या आंदोलन

Bangladesh Earthquake : बांगलादेश भुंकपाने हादरला; ६ जणांचा मृत्यू, भारतातही जाणवले धक्के

मीरा-भाईंदरकरांसाठी 'गुड न्यूज'! दहिसर-काशिमीरा मेट्रो 'या' महिन्यापासून सेवेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा

कांदिवली गोळीबार प्रकरण: बिल्डरवर गोळ्या झाडणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक; CCTV फुटेज समोर, ३ हल्लेखोरांचा शोध सुरू

उल्हासनगर राज्यातील राजकारणाचे नवे ‘हॉटस्पॉट’; भाजप-शिंदे संघर्षाची सुरुवात उल्हासनगरातूनच - फडणवीस