एनएमएमटी बस शेल्टर घोटाळा; जाहिरातीसाठीच शेल्टर ; शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी 
नवी मुंबई

Navi Mumbai : एनएमएमटी बस शेल्टर घोटाळा; जाहिरातीसाठीच शेल्टर ; शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

आवश्यक ठिकाणी न बसवता मुख्य रस्त्यांवरील जाहिरातीस पोषक जागांवरच नवे शेल्टर बसवले जात आहेत. एवढेच नव्हे, तर ज्या ठिकाणी एनएमएमटीचा बसमार्गच नाही त्या ठिकाणीही केवळ जाहिरात लावण्यासाठी शेल्टर उभे केल्याचा आरोप आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) अंतर्गत बस शेल्टर नव्याने बसवण्याचे काम सुरू असताना अनेक अनियमितता समोर आल्याचा आरोप शिवसेने (उबाठा)तर्फे करण्यात आला आहे. आवश्यक ठिकाणी न बसवता मुख्य रस्त्यांवरील जाहिरातीस पोषक जागांवरच नवे शेल्टर बसवले जात आहेत. एवढेच नव्हे, तर ज्या ठिकाणी एनएमएमटीचा बसमार्गच नाही त्या ठिकाणीही केवळ जाहिरात लावण्यासाठी शेल्टर उभे केल्याचा आरोप आहे.

एनएमएमटी अंतर्गत १५ वर्षांच्या बांधा-वापरा-हस्तांतरण (B.O.T.) तत्त्वावर २७५ बस शेल्टर उभारणी, जाहिरात हक्क, देखभाल आणि महसूल संकलनाचा करार दिला होता. या कराराची मुदत वाढवताना अनेक नियमांवर गोंधळ निर्माण झाला असून, निर्णय प्रक्रियेत स्पष्ट नोंदी नसल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

बस नसताना बस शेल्टर?

शिवसेनेने पुढे मोठा मुद्दा उपस्थित केला आहे की, पाम बीच गॅलरी, सीवूड्स स्टेशनसमोर, पाम बीच मोराज परिसरात एनएमएमटीचे बसमार्गच नसताना तिथे शेल्टर बसवण्यात आले आहेत. याउलट एमआयडीसी, अंतर्गत भाग, आणि जीर्ण अवस्थेतील शेल्टर मात्र जुनेच ठेवण्यात आले आहेत. वाशी-कोपरखैरणे मार्गावर बहुतेक शेल्टर व्यवस्थित असूनही ती बदलण्यात आली आहेत, ज्यामुळे “जाहिरातीसाठीच हे सर्व बदल?” असा संशय व्यक्त केला जात आहे.

एनएमएमटी शेल्टर हे प्रवाशांसाठी आहेत की जाहिरातींसाठी हेच कळत नाही. मुदतवाढ, नवीन बस शेल्टर, अनावश्यक ठिकाणी शेल्टर, जुन्यांची दुरवस्था… यात अनेक त्रुटी आहेत. तातडीने चौकशी करून अहवाल जाहीर करावा, अन्यथा उग्र आंदोलन करू.
समीर बागवान, उपशहर प्रमुख, शिवसेना (उबाठा)
शेल्टर मागणीप्रमाणे बांधले जातात. खराब किंवा मुदत संपलेल्या शेल्टरऐवजी नवीन बसवतात. बसमार्ग नसताना शेल्टर बसवले असल्यास तपास करून कारवाई केली जाईल. प्रवाशांची सेवा हे आमचे प्राधान्य आहे.
तुषार दौंडकर, प्रभारी व्यवस्थापक, एनएमएमटी

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन

नव्या वर्षात अमृता खानविलकरची नवी इनिंग! आता रंगभूमीवर पदार्पण; म्हणाली - 'या' नाटकासाठी ‘हो’ म्हटलं, कारण...

"सरकारचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नाही तर...; सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

मॅनहोलमध्ये पडून मुलाचा मृत्यू; पालकांना दोन आठवड्यांत ६ लाखांची नुकसानभरपाई द्या - उच्च न्यायालयाचे KDMC ला आदेश