संग्रहित फोटो
नवी मुंबई

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी विशेष शिबिराचे आयोजन

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ६० वर्षांवरील नागरिकांना 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चा लाभ देण्याकरिता सोमवारी दिनांक ९ सप्टेंबर रोजी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये सकाळी १०.०० वाजेपासून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Swapnil S

पनवेल : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ६० वर्षांवरील नागरिकांना 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चा लाभ देण्याकरिता सोमवारी दिनांक ९ सप्टेंबर रोजी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये सकाळी १०.०० वाजेपासून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी लाभार्थ्यांच्या नोंदणीसहित प्रमाणपत्रासाठी वैद्यकीय आरोग्य तपासणीची सुविधा देखील देण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने आयुक्तांनी केले आहे.

ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'ची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ३० हजार राहणार आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लाभ देण्यासाठी सोमवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विशेष शिबिराचे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा आयोजन करण्यात आले आहे.

आयुक्तांचे आवाहन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या प्रमाणपत्रासाठी महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणीची सोय देखील नाट्यगृहात करण्यात आली आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल