Panvel : परवाने निलंबित असतानाही पनीर निर्मिती सुरू! FDA ची रात्री छापेमारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा  प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

Panvel : परवाने निलंबित असतानाही पनीर निर्मिती सुरू! FDA ची रात्री छापेमारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा

तळोजा एमआयडीसी परिसरात परवाने निलंबित असतानाही दूध साठवणूक आणि पनीर निर्मितीचा व्यवसाय सुरू ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी रात्री तीन आस्थापनांवर छापे टाकले.

Swapnil S

पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरात परवाने निलंबित असतानाही दूध साठवणूक आणि पनीर निर्मितीचा व्यवसाय सुरू ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी रात्री तीन आस्थापनांवर छापे टाकले. यावेळी दूध आणि तयार पनीर नष्ट करण्यात आले असून, सहा जणांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा एमआयडीसीतील बालाजी इंडस्ट्रियल पार्क परिसरातील तीन आस्थापनांमध्ये अस्वच्छ वातावरणात दूध साठवून पनीर व दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात असल्याचे यापूर्वीच्या तपासणीत आढळले होते. मात्र, रात्रीच्या वेळी व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएने पुन्हा कारवाई केली.

या छाप्यादरम्यान दोन आस्थापनांमध्ये व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. अशी माहिती सहायक आयुक्त अजय मैत्रे यांनी दिली. या प्रकरणी बासदेव मोहन यादव, संजय शंकर यादव, नारायणलाल गणेशलाल डांगी, आशा संजय यादव, राधेश्याम रामकाबाल यादव आणि संतोष बाबुराव ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा सावरिया मिल्क अँड प्रॉडक्ट, मातेश्वरी फूड्स आणि रॉयल फूड्स या आस्थापनांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

महाराष्ट्र FDA करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास; औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

कंत्राटदारांचे आज आंदोलन; राज्य सरकारकडे ८६ हजार कोटी थकले

Mumbai : हुश्श! उष्णतेच्या लाटेपासून दिलासा; कुलाबा, अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक खराब हवा