'त्या' ट्रेकर्सची सुखरूप सुटका; पनवेल पोलिसांच्या तत्परतेने १३ ट्रेकर्सचा शोध  
नवी मुंबई

'त्या' ट्रेकर्सची सुखरूप सुटका; पनवेल पोलिसांच्या तत्परतेने १३ ट्रेकर्सचा शोध

इर्शाळगडावरून माची प्रबळगडकडे ट्रेकिंगसाठी निघालेल्या १३ जणांचा गट रस्ता चुकल्याने डोंगराळ परिसरात अडकला.

Swapnil S

पनवेल : इर्शाळगडावरून माची प्रबळगडकडे ट्रेकिंगसाठी निघालेल्या १३ जणांचा गट रस्ता चुकल्याने डोंगराळ परिसरात अडकला. त्यांनी ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी तत्काळ शोध व बचाव मोहीम राबवत सर्व १३ ट्रेकर्सची सुखरूप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेले १३ कर्मचारी शनिवारी सकाळी इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. सायंकाळी इर्शाळगडावरून उतरून ते माची प्रबळगडाकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात रस्ता चुकल्याने ते भरकटले आणि अडकून पडले. त्यानंतर त्यांनी ‘११२’ या आपत्कालीन सेवा क्रमांकावर संपर्क साधून मदतीची विनंती केली.

घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी आणि सात पोलीस अंमलदार, माची प्रबळ गावातील स्थानिक आणि हेल्प फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी काम केले.

पोलिसांचे आवाहन

अनेक तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर रात्री साडेदहा वाजता सर्व १३ ट्रेकर्सचा शोध लागला. त्यानंतर बचाव पथकाने त्यांना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली आणले. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. सुखरूप सुटका झाल्यानंतर ट्रेकर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पनवेल पोलिसांसह बचाव पथकाचे आभार मानले. दरम्यान, पावसाळ्यात डोंगराळ भागात ट्रेकिंग करताना योग्य नियोजन करावे, स्थानिक मार्गदर्शकांची मदत घ्यावी, हवामानाचा अंदाज तपासावा आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती