नवी मुंबई: नवी मुंबई मेट्रो मार्गिका-१ वर किरकोळ व व्यावसायिक वापरासाठी आणि जाहिरातीसाठी ‘सिडको’ इच्छुक व्यक्ती व कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहे. ११ रेल्वे स्थानकांवर ८१८३ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे.
नवी मुंबई मेट्रो सेवा कधी सुरू होणार याचा निर्णय अजूनही झालेला नाही, मात्र रेल्वे तिकिटाव्यतिरिक्त अन्य मार्गाने महसूल गोळा करण्याचे पर्याय सिडको निवडत आहे.
जाहिरात, दुकाने, अन्न पदार्थांचे स्टॉल, मेट्रो स्थानकाच्या आत व बाहेर जाहिराती आदींतून महसूल गोळा करण्याचे सिडकोने ठरवले आहे. बेलापूर ते पेंढार या मार्गावर सुरक्षा आयुक्तांनी व्यावसायिक परिचलनासाठी परवानगी दिली आहे.
१११८ चौरस मीटर जागा स्टेशनमध्ये, तर ७०६५ चौरस मीटर जागा स्टेशनबाहेर उपलब्ध आहे. प्रत्येक स्टेशनमध्ये दोन फिक्स दुकाने, एक फिरते दुकान व दोन एटीएम असतील. स्टेशनच्या तळमजल्याचा भाग दुकानांसाठी राखीव असेल. जास्तीत जास्त जागा खारघर गाव व अमनदूत स्टेशनमध्ये २३७० चौरस मीटर उपलब्ध आहे.