नवी मुंबई

रजनीश सेठ यांनी स्वीकारला एमपीएससी अध्यक्षपदाचा कार्यभार

आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी रजनीश सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्य पध्दती विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Swapnil S

नवी मुंबई : राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सोमवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार प्रभारी अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून सीबीडी बेलापूर येथील आयोगाच्या कार्यालयात स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, डॉ. अभय वाघ, डॉ. सतीश देशपांडे, आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुभाष उमराणीकर, सहसचिव सुनील अवताडे, उपसचिव मारुती जाधव, विपुल पवार, संशोधन अधिकारी राजश्री भिसे आदी उपस्थित होते.

आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी रजनीश सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्य पध्दती विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ही माहिती समजून घेतल्यानंतर रजनीश सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अतिशय शिस्तबध्दतेने, पारदर्शकपणे करु, असे आवाहन आयोगाच्या सन्माननीय सदस्यांना व इतर अधिकाऱ्यांना केले.

वारीसाठी पुणे पोलिसांची 'हायटेक' सुरक्षा व्यवस्था; एआय, ड्रोन, चेहरा ओळखणारी यंत्रणा, जीपीएस, सीसीटीव्हीसह आठ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा

बीपीसीएल, विमा कंपनीने भरपाई द्यावी! आगीबाबत न्यायालयाने दिले निर्देश

राज्यात देवस्थान जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट कार्यरत; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईतील पूरस्थिती ही नागरिकांची निर्मिती; BMC वर खापर फोडणे थांबवा - हायकोर्ट

MPSC परीक्षा ऑफलाइनच घ्या! रोहित पवार यांची विधानसभेत मागणी