नवी मुंबई

गुंगीचे औषध पाजून बलात्कार; चित्रीकरण करून केली बदनामी

महत्त्वाच्या कामाचे कारण सांगून एका महिलेस शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : महत्त्वाच्या कामाचे कारण सांगून एका महिलेस शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने पीडित महिलेची बदमानी करण्याच्या उद्देश्याने झाल्या प्रकारचे चित्रीकरणही केले होते. या प्रकरणी त्याला मदत करणाऱ्या नातेवाईकांच्या विरोधातही आय टी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहार.

मुंबईत राहणाऱ्या एका महिलेस महत्वाचे काम आहे असे सांगून बाळू शिंदे नावाच्या व्यक्तीने नवी मुंबईतील एका लॉज वर बोलावले होते. लॉज वर त्या महिलेस शीतपेयातून त्याने गुंगीचे औषध पाजले. तिची शुद्ध हरपताच तिचे लैंगिक शोषण केले गेले. तसेच आक्षेपार्ह चित्रीकरण करून फोटोही काढले. तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे फोटो आणि चित्रीकरण बाळू शिंदे याची विवाहित मुलगी आणि मुलाने व्हायरल केले. ही बाब लक्षात आल्यावर पीडित महिलेने या प्रकरणी मुंबईतील पोलीस ठाण्यात संशयित तिन्ही व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल