नवी मुंबई

अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

या अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव रुची राजेंद्र दळवी (१९) असे असून ती भांडुप पश्चिम भागात राहत होती. रुची दळवी ही नेरूळ एमआयडीसीतील आयटीएमआयएचएम या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

Swapnil S

नवी मुंबई : नेरूळ स्कुटीवरून भांडुप येथे घरी निघालेल्या एका तरुणीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी नेरूळ एमआयडीसीमध्ये घडली. या अपघातानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव रुची राजेंद्र दळवी (१९) असे असून ती भांडुप पश्चिम भागात राहत होती. रुची दळवी ही नेरूळ एमआयडीसीतील आयटीएमआयएचएम या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

बुधवारी सकाळी रुची आपल्या स्कुटीवरून घरी जात होती. यावेळी ती पुण्यनगरी कार्यालयासमोर आली असताना, अज्ञात वाहनाने तिच्या स्कुटीला समोरून धडक दिली.

यात रुची गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा त्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रुचीला धडक देणाऱ्या वाहनचालकाने पलायन केले असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सु‌रू केला आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती