छायाचित्र : फारुक सय्यद
नवी मुंबई

मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी वाशीत शिवसेना आक्रमक

महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्व परिसर दणाणून गेला.

Swapnil S

नवी मुंबई : महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्व परिसर दणाणून गेला.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छेडण्यात आलेल्या आंदोलनात नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख एम. के. मढवी, राज्य संघटक अवधेश शुक्ला, जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, युवासेना सहसचिव करण मढवी, विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सूर्यकांत मडवी, आत्माराम सणस, सुमित्रा कडू, शत्रुघ्न पाटील, संजय तुरे, संजय गव्हाणे, संदीप पाटील, मनोज इसवे, शहरप्रमुख महेश कोटीवाले, विशाल सणस, उपजिल्हा संघटक विनया मढवी, वैशाली घोरपडे, उषा रेणके, विधानसभा संघटक आशा शिंदे, भाग्यश्री पिसाळ, माजी परिवहन सदस्य समीर बागवान, राजू आव्हाड आदी सहभागी झाले होते.

दक्षिण मुंबईला मिळणार पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र; मुंबई पोर्टकडून DPR साठी तांत्रिक सल्लागारांची मागणी

राज्य सरकारची भूमिका मोदींच्या मतांहून वेगळी का? POP गणेशमूर्तींबाबत हायकोर्टाचा सवाल

कोकणात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा इशारा; घाटमाथा, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज

पोलिसी लाठीमाराचे समर्थन होऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai : वाहतूककोंडीवर भूमिगत बोगद्यांचा उतारा; सहा महिन्यांत आराखडा; ४ ते ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित