नवी मुंबई

अटल सेतूवरून शिक्षकाची आत्महत्या

५० वर्षीय प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने शुक्रवार सकाळी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली.

Swapnil S

नवी मुंबई : ५० वर्षीय प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने शुक्रवार सकाळी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली.

या शिक्षकाच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की, ते सेक्सटॉर्शनचा बळी ठरले होते. त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. कुटुंबातील काही नातेवाईक पोलीस खात्यात असून त्यांनी तक्रार करण्याचा सल्ला दिला होता, परंतु समाजात बदनामी होईल या भीतीमुळे त्यांनी तक्रार दाखल केली नाही, असे उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणे यांनी सांगितले.

सकाळी ७.३० वाजता हा शिक्षक घरातून बाहेर पडला. त्यांनी आपला मोबाईल घरीच ठेवला. ते सुमारे ९ किमी प्रवास करून अटल सेतूवर पोहोचले आणि गाडी थांबवून उडी मारली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची गाडी पुलावर उभी असल्याचे दिसले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात या पुलावर एका भरधाव कारच्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला होता.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती