Photo : X (Naresh Mhaske)
नवी मुंबई

विद्यार्थिनीची आत्महत्या; जबाबदार शिक्षिकेवर कारवाई करा; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा

ऐरोलीतील सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी अनुष्का केवळेच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या शिक्षिकेसह शाळा प्रशासनावर दोन दिवसांत गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

Swapnil S

ठाणे : ऐरोलीतील सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी अनुष्का केवळेच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या शिक्षिकेसह शाळा प्रशासनावर दोन दिवसांत गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

ऐरोलीतील सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील अनुष्का केवळे ही दहावी इयत्तेत शिकत होती. परीक्षा काळात तिच्या बाकाखाली एक चिट्ठी आढळली. कोणतीही खात्री अथवा चौकशी न करता ती नक्कल करत असल्याचा ठपका ठेवत शिक्षिकेने तिचा सर्वांसमोर अपमान केला. तिच्या आर्थिक परिस्थितीवरून जातीवाचक भाषेत अवमानकारक शब्द वापरले आणि संपूर्ण शाळेत सर्वांसमक्ष फिरवून तिची बदनामी केली.

हा अपमान सहन न झाल्याने १६ वर्षीय अनुष्काने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचे खासदार म्हस्के यांनी म्हटले आहे. शिक्षिकेच्या अपमानास्पद वागणुकीमुळे या कोवळ्या जीवाने टोकाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुष्काच्या कुटुंबियांची भेट घेऊन खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांना सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ठाण्यातील क्लस्टर, पुनर्विकासाला गती; १५ वर्षांत ३० लाख घरांचे लक्ष्य, सिद्धेश्वर नगरचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले