नवी मुंबई

‘एनएनएमटी’चे तिकीट डेबिट/क्रेडिट कार्डने काढण्याची सुविधा लवकरच मिळणार

नवी मुंबई मनपाचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘एनएनएमटी’ला याबाबतची यंत्रणा विकसित करण्याचे आदेश दिले

अमित श्रीवास्तव

नवी मुंबई मनपाच्या बसमधून तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला डेबिट/क्रेडिट कार्डने तिकीट काढण्याची सुविधा लवकरच मिळणार आहे. त्यामुळे सुट्टे पैसे खिशात बाळगण्याची गरज प्रवाशांना उरणार नाही.

नवी मुंबई मनपाचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘एनएनएमटी’ला याबाबतची यंत्रणा विकसित करण्याचे आदेश दिले. कोणत्याही बँकेचे डेबिट/क्रेडिट कार्ड असल्यास प्रवाशांना तिकीट मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

सध्या प्रवाशांना रोख रक्कम, क्यूआर कोड, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डने तिकीट खरेदी करता येते. तसेच ‘एनएमएमटी’ने पे फोनसोबत तिकिटासाठी करार केला आहे. एनएमएमटीच्या २५० मशीन्सवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड चालते. आता १०० टक्के गाड्यांमध्ये हे मशीन चालले पाहिजे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

आयुक्त बांगर यांनी एकात्मिक बुद्धिमत्ता वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेची तपासणी केली. यात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. ही यंत्रणा २०१७मध्ये विकसित केली असून, तिला राज्य व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. ‘एनएमएमटी’ पॅसेंजर अॅप्लिकेशन आकर्षक बनवून ते सहज सोपे बनवावे, अशी सूचना त्यांनी केली.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या

भारत-चीन हे विकासाचे भागीदार; पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची ठाम भूमिका

भारताच्या ‘एज्युकेट गर्ल्स’ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार; पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली