नवी मुंबई विमानतळ, संग्रहित छायाचित्र 
नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (TSPs) अदानी समूहाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (NMIAL) कडे विमानतळ परिसरात 4G आणि 5G सेवा सुरळीत देण्याकरीता ‘इन-बिल्डिंग सोल्यूशन्स’ (IBS) उभारणीसाठी आवश्यक परवानग्या मागितल्या होत्या, मात्र, NMIAL ने आवश्यक परवानग्या नाकारल्याचा आरोप COAI ने केला आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : अदानी समूहाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि आसपास नेटवर्क उभारताना दूरसंचार ऑपरेटर्सना भेडसावणाऱ्या दरांच्या समस्येची तपासणी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली.

TRAI करू शकते सुओ-मोटो कारवाई

ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, दूरसंचार कंपन्यांची संघटना सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) हस्तक्षेपासाठी त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि नियामक संस्थेने दूरसंचार कंपन्यांनी नेटवर्क उभारणीसाठी पूर्वी किती किंमत मोजली होती, याबद्दल तपशील मागवले आहेत. “COAI च्या पत्रात चार मुद्दे मांडले गेले आहेत. त्यापैकी तीन ‘राईट ऑफ वे’ (RoW) संदर्भातील असून, एक मुद्दा दरांबाबत आहे. यापूर्वी नेटवर्क उभारणीसाठी कोणत्या प्रकारचे करार झाले होते, त्याबाबतची माहिती आम्ही COAI कडून मागवली आहे. ती तपासून पुढील कारवाई करू,” असे लाहोटी म्हणाले. या प्रकरणात सरकारकडून वेगळ्या संदर्भाची कोणत्याही विशिष्ट संदर्भाची गरज नसून, COAI कडून आलेल्या निवेदनावरून ट्राय स्वतःहून (सुओ मोटो) कारवाई करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. RoW म्हणजे सार्वजनिक व खासगी मालमत्तांवर दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणे व चालवणे यासंबंधीचे नियम व अधिकार.

COAI ची दूरसंचार विभागालाही विनंती

COAI ने हस्तक्षेपासाठी दूरसंचार विभागाशीही संपर्क साधला आहे. COAI च्या म्हणण्यानुसार, टेलिकॉम सेवा प्रदात्यांनी (TSPs) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (NMIAL) कडे विमानतळ परिसरात 4G व 5G सेवा सुरळीत देण्यासाठी ‘इन-बिल्डिंग सोल्यूशन्स’ (IBS) उभारणीसाठी परवानग्या मागितल्या होत्या. मात्र, दूरसंचार कायदा, २०२३ आणि राईट-ऑफ-वे (RoW) नियम २०२४ यांच्या तरतुदींना विरोध करत NMIAL ने आवश्यक परवानग्या नाकारल्याचा आरोप COAI ने केला आहे.

NMIAL फेटाळले आरोप

तर, मोबाइल नेटवर्कसाठीची IBS यंत्रणा ही प्रत्येक दूरसंचार सेवा पुरवठादाराशी (TSP) अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतरच खरेदी करून बसवण्यात आली आहे. तसेच, सरकारी कंपनी BSNL सध्या विमानतळावर IBS वापरासाठी अंतिम टप्प्यातील चाचण्या करत आहे, असे एनएमआयएएलने निवेदनात म्हटले आहे. “चर्चा पूर्ण व्हावी यासाठी आम्ही TSPs सोबत सातत्याने संपर्कात आहोत. प्रत्येक कंपनीने स्वतंत्रपणे चर्चा करून दरांवर परस्पर सहमती द्यावी, यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, दरांबाबत कोणत्याही प्रकारच्या संगनमताला (कार्टेल) आम्ही थारा देणार नाही,” असे NMIAL ने स्पष्ट केले. तसेच, COAI ने केलेले आरोप फेटाळून लावत NMIAL ने सांगितले की, विमानतळावर कोणत्याही दूरसंचार कंपनीला राईट ऑफ वे (RoW) कधीही नाकारण्यात आलेले नाही. TSPs सोबत नियमित संवाद व चर्चा सुरू असून, सध्याच्या मानकांनुसार दर ठरवून IBS सेवा देण्याची ऑफर आधीच देण्यात आली आहे. मात्र, या ऑफरवर दूरसंचार कंपन्यांकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही.

२९ पैकी १५ ठिकाणी महिला महापौर; महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा लिस्ट

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

Republic Day Alert: '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी

तपासणीच्या बहाण्याने विमानतळ कर्मचाऱ्याचे कोरियन महिलेसोबत अश्लील कृत्य; पुरुषांच्या वॉशरूमजवळ घेऊन गेला अन्...