नवी मुंबई

कारच्या धडकेत स्कुटीवरील दोन तरुणींचा मृत्यू

दोन अवजड वाहनांच्यामधून दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दोन युवतींचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : दोन अवजड वाहनांच्यामधून दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दोन युवतींचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोघी कॉल सेंटरवरून रात्रपाळी करून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यामध्ये एक युवती जागीच ठार झाली तर उपचार सुरू असताना दुसरीचा मृत्यू झाला.

संस्कृती खोकले (२२) आणि अंजली पांडे (१९) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतींचे नावे आहेत.

सकाळी पावणेसातच्या दरम्यान आपली रात्रपाळी करून अंजलीला बोनकोडे गावात सोडण्यास संस्कृती येत होती. बोनकोडे जवळ असणाऱ्या वीरशैव स्मशान भूमिनजीक त्या आल्या असता समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात झाल्यावर कारचालक मदत न करता निघून गेला.

यात दुचाकी चालक संस्कृती जागीच ठार झाली तर अंजलीला आसपासच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना चारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. प्राथमिक तापसानुसार त्या विरुद्ध दिशेने गाडीवर जात होत्या. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय उपाळे पुढील तपास करीत आहेत.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता