उरण : चिरनेरच्या श्री महागणपतीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी 
नवी मुंबई

उरण : चिरनेरच्या श्री महागणपतीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

संकष्टी चतुर्थी आणि रविवारची सुट्टी यांचा योग जुळून आल्याने उरण तालुक्यातील चिरनेर येथील नवसाला पावणारे श्री महागणपती मंदिर भाविकांनी फुलून गेले.

Swapnil S

उरण : संकष्टी चतुर्थी आणि रविवारची सुट्टी यांचा योग जुळून आल्याने उरण तालुक्यातील चिरनेर येथील नवसाला पावणारे श्री महागणपती मंदिर भाविकांनी फुलून गेले. तालुक्यासह रायगड आणि इतर जिल्ह्यांतील हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी चिरनेर येथे मोठी गर्दी केली.

पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर समिती, विश्वस्त आणि ग्रामस्थांनी दर्शनासाठी योग्य नियोजन केल्याने भाविकांना सुरळीतपणे दर्शन घेता आले. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

श्री महागणपती मंदिरासह परिसरातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांनाही पर्यटकांची मोठी पसंती मिळाली. १९३० च्या जंगल सत्याग्रहातील स्तंभ, हुतात्म्यांचे शिल्परूपी स्मारक तसेच अक्का देवी डोंगराच्या कुशीतून वाहणारा ओसंडून वाहणारा धरण परिसर पाहण्यासाठीही मोठी गर्दी झाली. त्यामुळे दिवसभर चिरनेर गावात भाविक आणि पर्यटकांची वर्दळ कायम होती.

चिरनेरचा श्री महागणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असल्याने अनेक कुटुंबांनी श्रींचे दर्शन घेऊन नवस फेडला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी संकष्टी चतुर्थी आल्याने मंदिर परिसरात विशेष उत्साहाचे वातावरण होते.

यंदा ऑगस्ट महिन्यात दोन संकष्टी चतुर्थी येत असून त्यानंतर लगेच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी हा संपूर्ण काळ आध्यात्मिक उत्सवाचा ठरणार असून, पुढील काही आठवड्यांतही चिरनेर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई ते वाढवण प्रवास वेगवान! उत्तन-विरार सी लिंक आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यास मंजुरी

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

युरियाचा ८८ लाखांचा काळाबाजार उघडकीस; खताच्या ७२८ गोण्या जप्त, लासलगाव पोलिसांची मोठी कामगिरी

Bhiwandi : 'आधी पुनर्वसन, मगच कारवाई'ची भूमिका; कोहिनूर दुर्घटनेनंतर पाडकामाला रहिवाशांचा विरोध, नागरिकांशी आज सविस्तर चर्चा

राज्य धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; राज्यात कायदा लागू, बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतचा कारावास