खोपोलीतील धबधब्यावर अडकलेल्या युवकाची सुटका 
नवी मुंबई

खोपोलीतील धबधब्यावर अडकलेल्या युवकाची सुटका

मुंबईतील कुर्ला येथील रहिवासी असलेला मोहम्मद जुहेर शेख हा १८ वर्षीय तरुण कुटुंबाला न सांगता खोपोली येथील धोकादायक केपी धबधब्यावर गेला होता.

Swapnil S

नवी मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील रहिवासी असलेला मोहम्मद जुहेर शेख हा १८ वर्षीय तरुण कुटुंबाला न सांगता खोपोली येथील धोकादायक केपी धबधब्यावर गेला होता. मुसळधार पाऊस आणि निसरड्या वाटांवरून ३ तास ट्रेकिंग करून तो धबधब्याच्या उगमस्थानावर पोहोचला. तिथे सेल्फी आणि व्हिडिओ काढल्यानंतर परतताना तो खडकावरून घसरून पडला. यात त्याच्या हाताला दुखापत झाल्याने तो तिथेच अडकला.

जखमी अवस्थेत त्याने ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि पूरसदृश प्रवाहामुळे बचावकार्यात मोठे अडथळे आले. अखेर फोनवरील संपर्काच्या मदतीने त्याचा माग काढून त्याला सुखरूप खाली आणण्यात आले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला पाचारण करून तरुणाचे समुपदेशन केले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दंड थकवणाऱ्यांना 'अभय'; दंडावर २० टक्के सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला मोठा दिलासा; राम मॅन्शनच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ

दिवाळीआधी FDA ची मोठी कारवाई; राज्यव्यापी धडक मोहिमेत १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित, ४ आस्थापनांचे कामकाज केले बंद

दिवाळी अंक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महागाईतही किंमती स्थिर, मराठी दिवाळी अंकांची ११७ वर्षांची परंपरा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत