अन्न नासाडीपासून अन्न नेतृत्वापर्यंत मोठी संधी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
संपादकीय

अन्न नासाडीपासून अन्न नेतृत्वापर्यंत मोठी संधी

शेतीपासून कंपन्यांपर्यंत आणि स्थानिक बाजारपेठांपासून जागतिक मूल्य साखळ्यांपर्यंत, अन्न प्रणालींमधील परिवर्तन हे या प्रदेशाचे आर्थिक भवितव्य निश्चित करेल. दक्षिण आशिया अन्न नासाडीकडून अन्न नेतृत्वाच्या दिशेने अग्रेसर होऊ शकते.

नवशक्ती Web Desk

विशेष

चिराग पासवान

शेतीपासून कंपन्यांपर्यंत आणि स्थानिक बाजारपेठांपासून जागतिक मूल्य साखळ्यांपर्यंत, अन्न प्रणालींमधील परिवर्तन हे या प्रदेशाचे आर्थिक भवितव्य निश्चित करेल. दक्षिण आशिया अन्न नासाडीकडून अन्न नेतृत्वाच्या दिशेने अग्रेसर होऊ शकते.

दक्षिण आशिया आज आपल्या अन्नव्यवस्थेच्या प्रवासात एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. अत्यंत समृद्ध असा कृषी वारसा आणि वैविध्यामुळे, एक महत्त्वाचा कृषी प्रदेश असे स्थान मिळवूनही, दक्षिण आशियात शेतांतून ग्राहकांपर्यंत अन्नधान्य पोहचेपर्यंत त्यातील मूल्यांचे खूप मोठे नुकसान होते आहे. शेतकरी, रोजगारनिर्मिती आणि पोषणमूल्य अशा सर्वच क्षेत्रात असलेल्या क्षमतांसाठी ही एक हुकलेली संधी आहे. भारतातही याच विरोधाभासाचे प्रतिबिंब आपल्याला दिसते. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार, भारत जगात दूध आणि डाळींचा सर्वात मोठा तर फळे आणि भाजीपाल्याचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. मात्र तरीही, अन्नधान्याचे खूप मोठे नुकसान, पीक कापणी झाल्यानंतरची हाताळणी, साठवणूक, लॉजिस्टिक्स आणि अन्न प्रक्रिया यात असलेल्या त्रुटींमुळे तसेच, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसह जागतिक विकासाच्या गरजांच्या प्राधान्यांनुसार प्रगती करण्याला महत्त्व न देणे, यांचाही परिणाम झाला आहे. ही केवळ अकार्यक्षमता नाही तर आपण गमावलेली संधी आहे.

अन्नधान्याचा आपण गमावलेला प्रत्येक टन, म्हणजे शेतकऱ्याचे बुडालेले उत्पन्न, युवकांचा गेलेला रोजगार आणि कुटुंबांना न मिळालेलं पोषण आहे. हे नुकसान, मूल्यात परिवर्तीत करणे, याला आता संपूर्ण प्रदेशाने प्राधान्य देण्याची गरज आहे. अन्नप्रक्रिया ही मूल्यवर्धित कृषीचे मूल्य मिळवणारी गुरुकिल्ली आहे. अन्न प्रक्रिया, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडते, विविध कंपन्यांशी जोडते, स्थानिक उत्पादनांना प्रादेशिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडते. अन्न प्रक्रिया कृषी आणि व्यापक वित्तीय परिवर्तनातील त्रुटी भरून त्यांना एकत्र जोडणारा पूल आहे. विपुलतेपासून मूल्यापर्यंतचा प्रवास गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या कृषी धोरणाने, अन्नधान्य उत्पादन वाढवण्यावर आणि अन्नसुरक्षेवर भर दिला, जी त्या काळाची गरजच होती. या अजेंड्यानुसार काम केल्यामुळेच आपल्याला अन्नसुरक्षा साध्य करता आली. मात्र, आता त्याचा पुढचा टप्पा, मूल्य निर्मितीवर भर देणारा असायला हवा. रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पोषण मूल्यात सुधारणा करणे हा असायला हवा. भारतात, केवळ १७ टक्के कृषी उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते. २०३० पर्यंत हे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढायला हवे आणि त्यात असलेल्या वित्तीय क्षमतांचा संपूर्ण लाभ त्या क्षेत्राला घेता यायला हवा. त्याचवेळी, कापणी नंतर अन्नधान्याचे नुकसान कमी करणे आणि अन्न प्रक्रिया उद्योगाची साखळी मजबूत करणे हेही अधिकाधिक मूल्य अर्थव्यवस्थेतच राहील, हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. अन्नप्रक्रियेमुळे, अन्नधान्याच्या टिकावू क्षमतेत वाढ होते, अन्न सुरक्षा सुधारते तसेच नव्या देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठांचे मार्ग खुले होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या देशात याचे उत्पादन होत आहे, त्याच देशात, त्याचे आर्थिक मूल्य वाढल्याने, त्याचा लाभ शेतकरी, छोटे उद्योग आणि ग्रामीण समुदायाला मिळतो.

बाजारपेठप्रणित मूल्य साखळीला आकार देणे हे परिवर्तन प्रत्यक्षात आणण्यासाठी, संपूर्ण मूल्य साखळीतील प्रत्येक घटकात उत्पादन, संकलन, प्रक्रिया, लॉजिस्टिक्स आणि बाजारपेठेतील प्रवेश- योग्य समन्वय राखून नीट गुंतवणूक करणे आवश्यक असेल. यात, गुणवत्ता, सुरक्षितता, उत्पादनाचा मागोवा घेण्याची क्षमता आणि किफायतशीरपणा याविषयी ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक एकात्मिक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यावश्यक असेल. दक्षिण आशियातील समृद्ध कृषी वैविध्यात, उच्च मूल्यांची उत्पादने निर्मितीची क्षमता आहे, विशेषत: आज जेव्हा जगाच्या मागण्या, अधिक वैविध्यपूर्ण, पोषक मूल्यांच्या आणि विशेष अन्नधान्याच्या असताना, आपण या क्षमतांचा पुरेपूर वापर करायला हवा. त्याचवेळी, एखाद्या उत्पादनाचा मागोवा घेणे, गुणवत्ता मानके सुधारणे आणि अत्यंत गुंतगुंतीच्या जागतिक बाजारपेठांमध्ये आपली स्पर्धात्मकता वाढवणे, यासाठी डिजिटल सुविधा महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. सार्वजनिक गुंतवणुकीची भूमिका महत्त्वाची असते, परंतु तिने खासगी क्षेत्राच्या सहभागाला वेग व प्रेरणा देणे अत्यावश्यक असते. आवश्यक तेवढ्या प्रमाणात गुंतवणूक मिळवण्यासाठी, व्यवसायानुकूल वातावरण अधिक बळकट करणे, जोखीम कमी करणे आणि परिणामकारक पद्धतीने सार्वजनिक खासगी सहयोग घडवून आणणे अतिशय आवश्यक होय. भारताने यापूर्वीच सरकारच्या काही महत्त्वपूर्ण आणि सरकारला एक ओळख मिळवून देणाऱ्या कार्यक्रमांमधून महत्त्वाची पावले उचलली आहेत. उदा. प्रधानमंत्री किसान संपदा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजना आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसाठीची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना इत्यादी. या उपक्रमांमधून पायाभूत सुविधा बळकट होत आहेत, शीतगृह साखळ्यांचा विस्तार होत आहे आणि लघु तथा मध्यम उद्योगांना पाठबळ मिळत आहे.

यामुळे अधिक गतिशील आणि स्पर्धाक्षम अशा क्षेत्राचा पाया घातला जात आहे. अत्यंत आवश्यकता असेल तेथे रोजगारनिर्मिती अन्नप्रक्रियेचा संबंध काही फक्त आर्थिक क्षमतेशी नाही, तर उपजीविकांशीही अन्नप्रक्रिया उद्योग तितकाच संबंधित आहे. पूर्ण दक्षिण आशियाचा विचार करता, दरवर्षी कार्यबलात (वर्कफोर्समध्ये) लक्षावधी युवकांची भर पडत असते. येथून पुढे या सतत वाढत्या श्रमबळाला काम देण्यासाठी अगदी कृषी क्षेत्र झाले तरी, ते पुरेसे नाही. या प्रश्नावर उत्तम तोडगा काढण्याचे सामर्थ्य अन्नप्रक्रिया उद्योगाकडे आहे. अन्नप्रक्रिया उद्योगक्षेत्रामुळे, उत्पादन केंद्रांच्या अधिक जवळ उद्योगांची उभारणी होऊन, वाहतूक, दळणवळण, वेष्टन, अन्न तंत्रज्ञान आणि संबंधित सेवा- अशा विविध क्षेत्रांमध्ये विकेंद्रित रोजगारनिर्मिती होते. लघु तथा मध्यम उद्योगांना वाढीची संधी देत, त्यांना औपचारिक उद्योगांमध्ये रूपांतरित करत, आधुनिक मूल्य-साखळ्यांशी जोडून घेत हे क्षेत्र एक प्रकारे उद्योजकता-विकासाचा मार्गही प्रशस्त करते.

या क्षेत्राकडून मिळणारे खरे आश्वासन येथेच दडलेले आहे. केवळ अन्नाचे मूल्यवर्धन करून थांबणे हे या क्षेत्राचे कामच नव्हे, तर विशेषतः ग्रामीण भागात आणि त्यातही स्त्रिया व तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्थपूर्ण रोजगारनिर्मिती करण्याची ग्वाही हे क्षेत्र देते, ही खरी मेख आहे. परिवर्तनशील अशा जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत टिकाव धरून राहणारी भारताची प्रक्रियाकृत अन्नाची निर्यात स्थिरपणे वाढत आली आहे. जागतिक बाजारपेठेत तिच्या भूमिकेचे वाढते महत्त्वच यातून प्रतिबिंबित होते. नव्या व्यापार करारांमुळे जसजशा बाजारातील संधी निर्माण होतील, तसतसा कच्चा माल निर्यात करण्याकडून अधिक मूल्याच्या प्रक्रियाकृत उत्पादनांची निर्यात करण्याकडे कल वाढत गेला पाहिजे आणि त्यास अधिकाधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे.

दिवसेंदिवस जागतिक ग्राहकांना सुरक्षित, पोषक, सहज शोधून काढता येईल (traceable) असे आणि शाश्वत/संतुलित पद्धतीने तयार केलेले अन्न हवे आहे. यामुळे तर, गुणवत्ता, मापदंड आणि नवोन्मेष यांवरील जबाबदारी अधिक वाढते आणि भारत आता या बाबतींतील क्षमतांमध्ये हळूहळू वाढ करत चालला आहे. या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी, तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा, अन्नाचा मागोवा घेणाऱ्या प्रणाली आणि ब्रॅण्डिंग (नावाने प्रसिद्ध होणे) यांमध्ये गुंतवणूक होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जागतिकदृष्ट्या स्पर्शक्षम अशा मूल्यसाखळ्या निर्माण केल्यास, उत्पादकांना आणि उद्योजकांना मूल्यसाखळीच्या वरच्या टप्प्यावर चढता येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये त्यांचा ठसा उमटवता येईल. संतुलिततेचा/ शाश्वततेचा गाभा अन्नव्यवस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणायचे तर ते, शाश्वतही असले पाहिजे आणि त्यास मोठ्या आव्हानांसमोर तगही धरून राहता आले पाहिजे. जमीन, पाणी आणि ऊर्जास्रोतांवरील ताण कमी करण्यासाठीच्या उपायांमध्ये, अन्नाची नासाडी कमी करणे हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. त्याचवेळी, कचऱ्यातून मौल्यवान वस्तूंची निर्मिती (टाकाऊतून टिकाऊ)- म्हणजे कृषी कचऱ्याचे नव्या उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यामधील अभिनव संकल्पनांमुळे, नव्या आर्थिक संधी तर निर्माण होत आहेतच, शिवाय पर्यावरणीय परिणामही कमी होण्यास मदत होत आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाची संतुलित परिसंस्थेचे काम सर्वच कसोट्यांवर मौल्यवान ठरते. अधिक चांगल्या पोषणमूल्ययुक्त पदार्थांची निर्मिती करण्यास मदत, पर्यावरणावर होणारे आहे. त्याकरिता सिद्ध होणे आता अपरिहार्य आहे.

(लेखक हे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत.)

महायुतीचे सहा बिनविरोध; विधान परिषद अर्जमाघारीचा टप्पा संपला, ११ जागांवर युती विरुद्ध आघाडी थेट लढत, उमेदवारांची ऐनवेळी माघार, ठाकरे गटाला फटका

जून महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ५ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Cleaning Tips : डब्याची बॅग फक्त वरून पुसून उपयोग नाही; 'या' सोप्या उपायांनी करा डीप क्लिनिंग

पेडीक्यूअरवर पैसे खर्च करण्यापूर्वी गरम पाण्याची ही ट्रिक करून पाहा; पाय होतील मऊ-मुलायम