संपादकीय

आरोग्यवेध : टोमॅटो केचअपमुळे उच्च रक्तदाबाचा धोका

नवीन पिढीमध्ये फास्ट फूड सेवनाची मोठी क्रेझ आहे. यामध्ये टोमॅटो केचअपचे अतिरेकी सेवन केले जाते.

नवशक्ती Web Desk

लेखिका: डॉ. मेघा दळे

नवीन पिढीमध्ये फास्ट फूड सेवनाची मोठी क्रेझ आहे. यामध्ये टोमॅटो केचअपचे अतिरेकी सेवन केले जाते. टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचअपमध्ये असणार्‍या विविध हानीकारक रासायनिक घटकांमुळे शरीरारामध्ये अनेक विकार निर्माण होण्याची शक्यता असते. अनेकांना पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राइजसोबत टोमॅटो केचअप म्हणजेच टोमॅटो सॉस खाण्याची आवड असते. टोमॅटो केच अपचा टँगी फ्लेवर अनेकांना आवडतो; पण तो जास्त खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. टोमॅटो केचअप खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे जास्त प्रमाणात टोमॅटो केचअप खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

टोमॅटो केच अप बनवण्यासाठी केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटीव्हजचा वापर केला जातो. त्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे केच अप जास्त प्रमाणात खाणे टाळावे. त्यात साखर आणि मीठाचे प्रमाण जास्त असते. जास्त मीठामुळे उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो. केच अप हा आम्लयुक्त म्हणजेच अ‍ॅसिडीक पदार्थ आहे. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. तो बनवण्यासाठी डिस्टिल्ड व्हिनेगर आणि फ्रक्टोज शुगर जास्त प्रमाणात वापरली जाते. यासोबतच रेग्युलर कॉर्न सिरप आणि कांद्याची पावडरही वापरली जाते. त्यात भरपूर केमिकल्स वापरली जातात. त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले जाते.

टोमॅटो केचअपमध्ये प्रथिने, फायबर किंवा खनिजे नसतात. साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीवरही परिणाम होऊ शकतो. तो बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो गरम पाण्यात टाकून ते उकळले जातात. यानंतर त्याच्या बिया आणि साल काढून ते शिजवले जातात. या प्रक्रियेला अनेक तास लागतात. त्यामुळे टोमॅटामधील पोषक तत्व नष्ट होतात. टोमॅटो सेवन आवडत असेल तर केच अपऐवजी टोमॅटो कापून खावा. टोमॅटोपासून विविध पदार्थ घरी बनवता येतात. टोमॅटो सूप, टोमॅटोची भाजी, टोमॅटो टाकून केलेले सॅलड, टोमॅटोची चटणी इत्यादी टोमॅटोपासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाता येतात.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत