संपादकीय

यूपीआय: दुनिया मेरी हाथों में

आजकाल अगदी रस्त्याच्या कडेला फुलांची विक्री करणाऱ्या हातगाडीवरील विक्रेत्याकडे मोबाईल आणि यूपीआय पेमेंटची सोय असते. भारतात अतिशय अल्प दरात उपलब्ध असलेली मोबाईल सेवा आणि इंटरनेट यामुळे संपर्कक्षेत्रात जशी क्रांती झाली अगदी तशीच खळबळ माजवून ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’ने (UPI) आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.

नवशक्ती Web Desk

- उदय पिंगळे

ग्राहक मंच

आजकाल अगदी रस्त्याच्या कडेला फुलांची विक्री करणाऱ्या हातगाडीवरील विक्रेत्याकडे मोबाईल आणि यूपीआय पेमेंटची सोय असते. भारतात अतिशय अल्प दरात उपलब्ध असलेली मोबाईल सेवा आणि इंटरनेट यामुळे संपर्कक्षेत्रात जशी क्रांती झाली अगदी तशीच खळबळ माजवून ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’ने (UPI) आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.

पीआयमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. एकापेक्षा अधिक बँक खात्यांना एकाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आणून पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार करता येतात. व्यापारी पेमेंट करता येते, संकलन विनंती करता येते. ही विनंती शेड्युल करून आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार करता येते. ११ एप्रिल २०१६ रोजी ‘नॅशनल पेमेंट क्लिअरिंग कॉर्पोरेशन’ने रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या हस्ते या सेवेचे प्रायोगिक तत्त्वावर उद्घाटन करून सदस्य असलेल्या २१ बँकांच्या सहाय्याने ही प्रणाली सुरू केली. बँकांनी २५ ऑगस्ट २०१६ पासून प्ले स्टोर, ॲप स्टोअर्सवर अँड्रॉईड आणि आयओएसवर चालणारी यूपीआय सक्षम ॲप्स उपलब्ध करून दिली.

या प्रणालीची वैशिष्ट्ये-

तत्काळ देवाणघेवाण

वेगवेगळ्या बँकांसाठी एकाच ॲपची गरज

कोणत्याही वैयक्तिक माहितीशिवाय आभासी पत्त्याद्वारे व्यवहार शक्य उदा. abc@*****

इन ॲप पेमेंटसह व्यापारी पेमेंट

वीज, गॅस, लाईट, मोबाईल रिचार्ज, गुंतवणूक, डीटीएच केबल बिल, फास्टट्रॅक रिचार्ज, क्रेडिट कार्ड यासारख्या सेवांची बिले अथवा त्यांचा वापर करण्यासाठीचे पेमेंट, गुंतवणूक करता येणे शक्य.

बँकेने दिलेली क्रेडिट लाईन सुविधा तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड याद्वारे व्यवहार करता येणे शक्य.

बँक खात्याची शिल्लक पाहणे.

ओटीसी काउंटर पेमेंट, क्यू आर कोड म्हणजे स्कॅन अँड पे सारखे व्यवहार करता येणे शक्य. उदा. हॉटेलमध्ये जेवल्यावर काउंटरवर कॅशियरकडे बिल भरणे किंवा पेट्रोल भरल्यावर पेट्रोलचे पैसे देणे.

संकलन म्हणजे पेमेंट घेणे तर वितरण म्हणजे पेमेंट करता येणे शक्य होणे.

यूपीआय मधील सहभागी घटक -

पैसे देणारा आणि घेणारा.

पैसे पाठवणारी आणि लाभार्थी बँक.

एनपीसीआय (पैसे समायोजन करणारी संस्था).

व्यापारी.

कोविड महामारीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने ही पद्धत उपयोगी ठरली आणि त्यातील सोयी पाहून बहुतेक लोकांनी ही पद्धत स्वीकारली असून आता सर्वाधिक व्यवहार हे यूपीआय द्वारे होतात. जुलै २०२४ रोजी २०६ लाख कोटीहून अधिक रकमेचे १४४ लाख कोटींहून अधिक व्यवहार यूपीआय द्वारे केले गेले असून ते एकूण व्यवहाराच्या ६०% हून अधिक आहेत. पारंपरिक रोख व्यवहारापासून दूर जाण्याचा ग्राहकांचा कल, ॲपमधील मूल्यवर्धित सोयी, ॲपची वाढती संख्या लक्षात घेता येत्या पाच वर्षात हे प्रमाण ९०% हून अधिक असण्याची शक्यता आहे. भविष्यात रोज १०० कोटींहून अधिक व्यवहार यूपीआय द्वारे होतील.

यूपीआयवर आधारित विविध लोकप्रिय ॲप्स-

फोन पे, भीम, पेटीएम, गुगल पे, अक्ष पे, फ्री चार्ज, क्रेड, आय मोबाईल पे, झ्याप पॉकेट ही यूपीआयवर आधारित ॲप्स ग्राहकस्नेही असून ती डाउनलोड करणे, कार्यान्वित करणे अगदीच सोपे आहे. त्याला सरकारी पाठबळही आहे. ती सुरक्षित आहेत. त्यात काही समस्या आल्यास त्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून सोडवता येतील. यात काही किरकोळ गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर मात करण्याचे उपायही आहेत. याप्रमाणे त्यांचा वापर केल्यास आपल्याला त्यांचा उपयोगच होतो. यासाठी आपल्याकडून कोणतेही शुल्क सध्यातरी घेतले जात नाही. हे शुल्क मुळातच खूप नगण्य असून ते व्यावसायिकांकडून घेतले जाते. त्यांचा व्यवसाय वाढत असल्याने सर्वच व्यावसायिकांनी या सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार यातून मिळणाऱ्या सेवांमध्ये सातत्याने वाढ होत असते. काही ॲप्सवर आपण तोंडी सूचना देऊ शकतो. आज खरेदी करा, उद्या पैसे द्या किंवा हप्त्याने पैसे द्या इत्यादी. कर्ज मिळणे, नवे खाते उघडणे, आपल्या घरातील अतिवृद्ध व्यक्ती बँक खात्याशी संलग्न न होता मर्यादित रक्कम खर्च करू शकतील अशी सुविधा पुरवणे, मुलांच्या पॉकेटमनीसाठी याचा वापर करता येईल, अन्य स्मार्ट उपकरणात सुद्धा ही सेवा वापरता येईल अशा सुधारणा यात होत आहेत किंवा अपेक्षित आहेत. तेव्हा त्यांचा वापर करणे आपण टाळू शकणार नाही. ‘यूपीआय साथ में, तो दुनिया मेरी हाथोंमें’…. .ही टॅगलाईन त्यांना सर्वार्थाने लागू पडते.

यूपीआय पेमेंट ॲप्स विषयीचे सर्वसामान्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे-

सर्वोत्तम यूपीआय ॲप कोणते?

- फोन पे, गुगल पे, भीम, पेटीएम हे विश्वासार्ह असल्याने त्यांचा सर्वाधिक वापर केला जातो.

यूपीआयसाठी सर्वोत्तम बँक कोणती?

- एचडीएफसी बँक ही त्याच्या डेबिट रिव्हर्सल दरातील यशामुळे लोकप्रिय आहे.

आपण एकाहून अधिक यूपीआय ॲप वापरू शकतो का?

हो, प्रत्येक ॲपचे कमी अधिक वैशिष्ट्य असल्याने आपण सोयीनुसार एकाहून अधिक ॲप वापरू शकतो.

रुपे (RuPay) ची मालकी कोणाकडे आहे?

- ही एनपीसीआय ( NPCI) ची निर्मिती असून पूर्णपणे स्वदेशी आहे.

यूपीआय व्यवहार मर्यादा किती आहे?

- रोज एक लाख. अलीकडेच हॉस्पिटल पेमेंट, कर भरणा, शैक्षणिक संस्थांना पेमेंट करणे यासारख्या काही सेवांसाठी ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

विशिष्ट यूपीआय ॲपची मक्तेदारी भविष्यात होऊ शकते का?

- सध्या फोनपे, गुगलपे आणि काही प्रमाणात पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. अनेक ग्राहकांना उपयुक्त अशी ॲप बाजारात येत असून कोणत्याही एका ॲपने ३०% हून अधिक बाजारपेठा काबीज करू नये असे एनसीपीआय ( NCPI) चे धोरण असून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मुंबई ग्राहक पंचायत

mgpshikshan@gmail.com

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी