दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीच्या बहिणीचा साखरपुडा नुकताच पार पडला. 
फोटो

अभिनेत्री साई पल्लवीच्या बहिणीचा झाला साखरपुडा, साईने शेअर केले सुंदर फोटो

Swapnil S
अभिनेत्रीची बहीण पूजा कननचा पारंपरिक पद्धतीत,थाटामाटात साखरपुडा पार पडला.
या कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो साईने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री साई पल्लवीची बहीण पूजाचा लाँगटाईम बॉयफ्रेंड विनीत कननशी २१ जानेवारीला साखरपुडा झाला.
अभिनेत्रीने काल फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.
साईने साखरपुड्यातील खास क्षण शेअर करत कॅप्शन लिहिलं, “माझ्या लहान बहिणीचा साखरपुडा झाला यावर माझा विश्वास बसत नाहीये. जीजू तुला माहित नसेल तू आयुष्यात काय मिळवलं आहेस. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे.” साईच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह तिचे चाहते पूजाला साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
साखरपुड्यात पूजाने आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सारख्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
तर साईने ऑफ व्हाइट रंगाची आणि पिवळी किनार असलेली साडी नेसली होती. या साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली