रोज ७ ते ८ तास झोप घेणे महत्त्वाचे आहे. अनेकांना दिवसभर काम करूनही रात्री लवकर झोप येत नाही. रात्री नीट झोप झाली तरंच दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं. तसेच रात्री झोप झाली नाही तर थकवा जाणवतो, आळस येतो, कामात उत्साह येत नाही. अनेक आजांरानाही सामोरे जावे लागते. त्यामुळे जर तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर पुढे दिलेले साधे-सोपे उपाय करून पाहा.झोपण्यापुर्वी ध्यान करा – झोपण्यापुर्वी काही मिनिटांसाठी ध्यान केल्याने तुमचे मन शांत होईल आणि चांगली झोप येईल.शक्यतो रात्रीच्या जेवणात जड अन्नपदार्थ टाळावेत,रात्रीचा आहार हलका घ्या,जेणेकरून पचनास मदत होईल यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.रोजच्या झोपेची एक वेळ ठरवा त्यानुसार वेळापत्रक बनवा आणि वेळेवर झोपा. नियमित त्याच वेळी झोपेची सवय लावून घ्या.रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका. थोडा वेळ बाहेर फिरायला जा, शतपावली करा, चालल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि शांत झोप लागते.संध्याकाळनंतर शक्यतो कॅफिनयुक्त पदार्थ टाळा. कॉफी, चहा किंवा इतर पेये पिणेही टाळा. कॅफीनमुळे झोपेची गुणवत्ता कमी होते.रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे किंवा संगणकावर काम करणे टाळाझोपण्याच्या आधी मोबाईलचा वापर करणे टाळा. त्यामुळे आपण झोपेवर लक्ष्य केंद्रीत करू शकत नाही. झोपण्यापूर्वी एक तास आधी फोन बाजूला ठेवा.रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. यामुळे तुमचे रोजचे वेळापत्रक योग्य राहणार. या नियमित सवयीमुळे रोजच्या रोज वेळेवर चांगली झोप येईल. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )