फोटो सौ : Free Pik
फोटो

गोड खाण्याची इच्छा आहे? पण आरोग्याची भीती वाटतेय? मग 'हा' पदार्थ खा

तुम्ही काही तज्ज्ञांचे मत ऐकले असेल की साखरेमध्ये प्रक्रिया केलेले रासायनिक पदार्थ असतात, त्यामुळे ते तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. हे खरं आहे! मग गोड पदार्थ आणि गोड खाण्याच्या इच्छांपासून पूर्णपणे दूर राहावे का? अजिबात नाही.

Swapnil S

तुम्ही काही तज्ज्ञांचे मत ऐकले असेल की साखरेमध्ये प्रक्रिया केलेले रासायनिक पदार्थ असतात, त्यामुळे ते तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. हे खरं आहे! मग, गोड पदार्थ आणि गोड खाण्याच्या इच्छांपासून पूर्णपणे दूर राहावे का? अजिबात नाही.

प्रत्येकाला गोड खाण्याची इच्छा होत असतेच, पण ते आरोग्याची काळजी घेण्यासाठी गोड खाणे टाळतात. त्यासाठी तुम्ही साखरेला आणि इतर गोड पदार्थांना पर्यायी म्हणून रोज थोडा गुळ खाऊ शकता. काळजी करू नका, आरोग्याला लाभदायक असलेला गुळ कोणत्याही प्रकारची तडजोड न करता तुम्ही खाऊ शकता. वाचा गुळ खाण्याचे फायदे :

वारंवार गळ्याचा संसर्ग किंवा खोकल्याची तक्रार असणाऱ्या लोकांसाठी गुळ खाणे एक चांगले औषध असू शकते. जेव्हा गुळ लाळेमध्ये नैसर्गिकपणे विरघळतो, तेव्हा त्याच्या औषधी गुणधर्मांनी तोंडाच्या संसर्गासंबंधीत समस्यांवर देखिल आराम मिळतो.

रासायनिक पदार्थांपासून मुक्त असलेल्या गुळामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वांचा नैसर्गिक पुरवठा असतो, ज्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे गुळाला आपल्या आहारात समाविष्ट करणे म्हणजे आरोग्यदायक पदार्थांचा समाविष्ट करणे आहे.

बद्धकोष्ठता दूर करतो

गुळ फक्त गळ्याच्या आणि फुफ्फुसांच्या संसर्गांवर प्रभावी ठरत नसून, इतर समस्यांवर जसे की पचनसंस्थेशी संबंधित समस्या बद्धकोष्ठता आणि कठीण मलावरही प्रभावी आहे.दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खाल्ल्याने अन्नपचनास मदत होते. गुळामुळे पित्ताचा त्रास देखिल कमी होतो.

आवश्यक खनिजांचा स्त्रोत

गुळामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे आवश्यक खनिजे असतात, जे हाडांच्या आरोग्याला मदत करतात, रक्ताच्या गुठळ्यांवर नियंत्रण ठेवतात तसेच गुळ हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

गुळाचा नियमित वापर आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे देतो. तरीही, तो योग्य प्रमाणात वापरला पाहिजे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

नाकापेक्षा मोती जड

जीवनसाखळी संरक्षित करूया!

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत