फोटो

दिवाळी पार्टीत सेलिब्रिटींचा जलवा! शिल्पा शेट्टी, उर्मिला मातोंडकरसह अभिनेत्रींच्या फेस्टिव्ह लूकची चर्चा

Diwali Party Photos 2026 : मुंबईतील Itrh Ki Diwali पार्टीत शिल्पा शेट्टी, श्रिया सरन, हुमा कुरेशी, उर्मिला मातोंडकर आणि मृणाल ठाकूर यांच्या स्टायलिश फेस्टिव्ह लूकचे खास फोटो पाहा.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : दिवाळीचा उत्साह आणि सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज यांची झलक नुकतीच मुंबईतील एका खास पार्टीत पाहायला मिळाली. शनिवारी, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी IBTIDA Ek Mehfil आयोजित Itrh Ki Diwali या दिवाळी सोहळ्याला बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. शिल्पा शेट्टी, श्रिया सरन, हुमा कुरेशी, उर्मिला मातोंडकर, निम्रत  कौर आणि मृणाल ठाकूर यांच्या लूकने विशेष लक्ष वेधलं. कुणी साडीला पसंती दिली, तर कुणी भरजरी पारंपरिक पोशाखातून आपला फेस्टिव्ह अंदाज दाखवला. पाहूया या पार्टीतील अभिनेत्रींचे खास लूक!

शिल्पा शेट्टीचा आयव्हरी साडीत एलिगंट अंदाज

शिल्पा शेट्टीने आयव्हरी रंगाची लेस साडी नेसून पार्टीत खास छाप पाडली. या साडीसोबत तिने स्लीव्हलेस कॉर्सेट स्टाइल ब्लाऊज परिधान केला होता.

ब्लाऊजवरील मोती, बीड्स आणि क्रिस्टल्सच्या सजावटीमुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत होता. क्रिस्टल्सने सजवलेली हँडबॅग, डायमंड ज्वेलरी, इअर कफ्स आणि नीट बांधलेल्या हेअरस्टाइलने तिने आपला लूक पूर्ण केला.

हुमा कुरेशीचा ऑरेंज-गोल्ड अनारकली लूक

हुमा कुरेशीने या पार्टीला तिचा बॉयफ्रेंड रचित सिंह याच्यासोबत हजेरी लावली. तिने रस्ट ऑरेंज आणि गोल्ड रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता.

या ड्रेसवर झरी एम्ब्रॉयडरी, गोटा-पट्टी आणि आरशांची सजावट होती. भरजरी बॉर्डरमुळे तिच्या पारंपरिक लूकला खास उठाव मिळाला.

मृणाल ठाकूरचा ब्लॅक आउटफिट

मृणाल ठाकूरने यावेळी काळ्या रंगाच्या सलवार सूटची निवड केली. साध्या पण एलिगंट अंदाजात तिने हा पारंपरिक पोशाख कॅरी केला.

गोल्डन रंगाचे आकर्षक कानातले आणि अंबाड्यात बांधलेल्या केसांमुळे तिच्या लूकला उठाव मिळाला. कमी ॲक्सेसरीजमध्येही स्टायलिश दिसता येतं, हे मृणालच्या लूकमधून पाहायला मिळालं.

श्रिया सरनचा सिल्व्हर-ग्रे साडीतील पारंपरिक थाट

श्रिया सरनने चमकदार सिल्व्हर-ग्रे रंगाची साडी नेसली होती. या साडीसोबत तिने भरजरी एम्ब्रॉयडरी असलेला ब्लाऊज परिधान केला होता.

मल्टिलेअर कुंदन आणि मोत्यांचा चोकर नेकलेस, त्याला मॅचिंग कुंदन झुमके यांमुळे तिचा पारंपरिक लूक अधिक खुलला. पारंपरिक दागिन्यांसह मॉडर्न टच देण्याची तिची स्टाइल लक्षवेधी ठरली.

निम्रत कौरच्या ब्राऊन साडीची खास चर्चा

निम्रत कौरने मेटॅलिक सजावट असलेली ब्राऊन रंगाची साडी परिधान केली होती. साडीवरील नाजूक चमकदार डिझाइन आणि भरजरी बॉर्डरमुळे तिचा लूक आकर्षक दिसत होता.

डीप नेक ब्लाऊजवर सिल्व्हर आणि गोल्ड रंगाची एम्ब्रॉयडरी, बीडवर्क आणि चमकदार सजावट होती. तिने कमीत कमी दागिने घालून साडीला अधिक उठाव दिला. नीट बांधलेले केस, हलका मेकअप आणि न्यूड-पिंक लिपस्टिकमुळे तिचा लूक साधा आणि मोहक दिसत होता.

उर्मिला मातोंडकरचा पिस्ता ग्रीन घरारा सेट

उर्मिला मातोंडकरने पिस्ता ग्रीन रंगाचा भरजरी कुर्ता आणि घरारा सेट परिधान केला होता. त्यासोबत तिने आकर्षक चोकर नेकलेस आणि ड्रॉप इअररिंग्स घातले होते.

मोकळ्या, कुरळ्या केसांमुळे तिच्या पारंपरिक लूकला आणखी खुलावट आली. हलक्या हिरव्या रंगातील तिचा पोशाख दिवाळीच्या फेस्टिव्ह फॅशनसाठी वेगळा पर्याय ठरला.

कुशा कपिला, मीझान जाफरीसह इतर कलाकारांचीही उपस्थिती

या दिवाळी पार्टीला कुशा कपिला, मीझान जाफरी, अपारशक्ती खुराना आणि त्याची पत्नी आकृती तसेच अभिनेत्री अन्या सिंह यांनीही हजेरी लावली. पारंपरिक पोशाख, भरजरी एम्ब्रॉयडरी, आकर्षक दागिने आणि वेगवेगळ्या रंगसंगतींमुळे या सोहळ्यात फेस्टिव्ह फॅशनची रंगत पाहायला मिळाली.

एकूणच, Itrh Ki Diwali या पार्टीत अभिनेत्रींच्या साडीपासून अनारकली आणि घरारा सेटपर्यंतच्या विविध लूकने दिवाळीच्या फॅशनची झलक दाखवली. पारंपरिक शैलीला आधुनिक टच देणारे हे लूक सणासुदीच्या स्टाइलसाठी प्रेरणा देणारे ठरले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

चेंबूर, दादरवरून थेट दक्षिण मुंबईत; सायन सर्कलजवळील पुलाला दोन अतिरिक्त मार्गिका, १३० कोटींचा प्रकल्प; डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण होणार

मुंबईतील ४८ 'ब्लॅक स्पॉट' होणार सुरक्षित; अपघात रोखण्यासाठी दुभाजक, फलक लावणार

मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट

कराड : मुलाच्या खूनप्रकरणी घरातील तिघांना अटक