फोटो सौ : FPJ
फोटो

रोज शहाळ्याचे पाणी प्या.. आणि राहा तंदुरुस्त; जाणून घ्या काय आहेत फायदे

Swapnil S
कोवळा नारळ सर्वांनाच आवडतो. तो आरोग्यदायी घटकांनी भरलेला असतो. हे अनेकांना माहीत आहे. मोठे सेलिब्रिटीज, चित्रपट अभिनेते शहाळ्याचे पाणी पिताना बघायला मिळतात. ते मोठ्या हॉटेलमध्ये महागड्या पेयांपेक्षाही शहाळे पिणे पसंंत करतात. पाहुयात शहाळे पिण्याचे काय फायदे आहेत.
शहाळ्याचे पाणी नेहमीच ताजेतवाने असते. ते कधी शिळे होत नाही, ते थंड असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास त्याचा उपयोग होतो.
शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशियम, सोडीयम आणि मॅग्नीशियम असते. हे महत्वपूर्ण इलेक्ट्रोलाईट्स शरीरातील द्रव संतुलन करण्यास मदत करतात. ज्यांना प्रचंड घाम येतो त्यांच्यासाठी शहाळे पिणे फायद्याचे असते.
शहाळ्याच्या पाण्यात विटामिन सी आणि व्हिटॅमिन बी यासह जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
शहाळ्यातील पाणी पिल्याने शरीरात पार्टिकल्स आणि क्रिस्टल्स तयार करण्यास प्रतिबंध होतो, त्यामुळे किडनी स्टोनचा धोका टळतो.
शहाळ्याचे पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे त्यामुळे पचनशक्ती तयार होण्यस मदत होते. कारण या पाण्यात तंतुमय घटक मोठ्या प्रमाणावर असतात.
शहाळ्याचे पाणी पिल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कारण ते उच्च कॅलरी पेयांच्या तुलनेत कमी कॅलरीज असलेला एक उत्तम पर्याय आहे.
काहीवेळा पोट खराब झाल्याने वारंवार शौचास जावे लागते आणि डीहायड्रेशन होते. अशा वेळी शहाळाचे पाणी पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि डीहायड्रेशनमुळे आलेला अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
शहाळ्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. नियमितपणे पिल्याने तुमच्या शरीरात संसर्ग आणि रोगांशी लढण्याची क्षमता तयार होते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता