फोटो

नथ निवडताना गोंधळ होतोय? साडीप्रमाणे योग्य डिझाइन कशी निवडायची, इथे पाहा

जड, हलकी, साधी किंवा स्टेटमेंट नथ-आजकाल महिलांमध्ये साडीप्रमाणे वेगवेगळ्या डिझाइनची नथ वापरण्याचा ट्रेंड वाढताना दिसतो.

Mayuri Gawade

नथ निवडताना साडीचा प्रकार, प्रसंग आणि लूक याचा मेळ घालणं महत्त्वाचं ठरतं.

जड, हलकी, साधी किंवा स्टेटमेंट नथ-आजकाल महिलांमध्ये साडीप्रमाणे वेगवेगळ्या डिझाइनची नथ वापरण्याचा ट्रेंड वाढताना दिसतो.

जड पेशवाई नथ आणि पारंपरिक दागिन्यांचा हा साज लग्नसोहळ्यासाठी योग्य आहे. मोठ्या आकाराची नथ चेहऱ्यावर उठून दिसते. ब्रायडल लूक पूर्ण करणारा हा क्लासिक पर्याय.

माणिक-कुंदन जडावाची ही नथ सॉफ्ट मेकअप आणि हलक्या दागिन्यांसोबत चांगली जमते. साखरपुडा किंवा रिसेप्शनसाठी फार जड न वाटणारा लूक देते. एलिगंट आणि बॅलन्स्ड स्टाइल.

घुंगरांची आणि मोराकृती नथ नऊवारी साडीवर खास उठून दिसते. पारंपरिक कार्यक्रम किंवा धार्मिक विधींसाठी योग्य. मराठमोळा लूक सहज तयार होतो.

कानसाखळी असलेली मोठी नथ साध्या साडीवरही स्टेटमेंट लूक देते. फारसे दागिने न घालता लूक वेगळा दिसतो. फोटोशूट किंवा खास कार्यक्रमांसाठी उपयुक्त.

अतिशय नाजूक डिझाइनची ही नथ मिनिमल लूकसाठी योग्य आहे. कमी मेकअप आणि साधी साडी यावर चांगली जमते. रोजच्या वापरासाठी सहज घालता येते.

फुलाकृती नथ हळद किंवा घरगुती समारंभांसाठी छान पर्याय ठरते. हलकी आणि आरामदायी असल्यामुळे दिवसभर घालता येते. साध्या साजातही लूक फ्रेश दिसतो.

थोडी मॉडर्न डिझाइनची नथ पारंपरिक साडीवर वेगळा टच देते. कल्चरल इव्हेंट किंवा फेस्टिव्ह डे साठी योग्य. पारंपरिक आणि मॉडर्न यांचा बॅलन्स साधते.

छोटी गोल नथ आणि साधा साज रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहे. फार लक्ष वेधून न घेता लूक नीटनेटका ठेवते. कॅज्युअल साडी स्टायलिंगसाठी उपयोगी.

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा ओलांडल्या! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद