फोटो

त्वचेची कशी कराल देखभाल? सकाळी उठल्यानंतर करा 'ही' महत्त्वाची कामे

Swapnil S
आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं गरजेचं आहे. शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स केल्यास त्वचेवर चमक येण्यास मदत मिळते. यासाठी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच ग्रीन टी आणि नारळ पाणी प्यावे.
गुलाब पाणी, लिंबू रस एकत्र करा आणि यामध्ये ग्लिसरीन देखील मिक्स करा. हे मिश्रण सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर लावावे. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपला संपूर्ण चेहरा आणि मानेवर हे नॅचलर सीरम लावा. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्यासाठी क्लींझरच्या स्वरुपात काम करते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली अतिरिक्त दुर्गंध आणि तेल स्वच्छ होते. ग्लिसरीनमध्ये मॉइस्चराइझिंग चे गुणधर्म आहेत. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा टोन होण्यासह मदत मिळते.
सकाळच्या सुमारास त्वचेला चांगल्या पद्धतीने स्वच्छ, टोन आणि मॉइश्चराइझ देखील करावे. गुलाब पाणी हे एक चांगले आणि नैसर्गिक स्वरुपातील टोनर मानले जाते. गुलाब पाण्यामुळे चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद करण्यासाठी आणि त्वचा फ्रेश राहण्यासाठी मदत मिळते. टोनर लावल्यानंतर आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार त्यावर मॉइश्चराइझर लावावे.
सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुणे. थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील पोअर्स बंद होतात. थंड पाणी आपल्या चेहऱ्यासाठी अँटी रिंकल एजेंटच्या स्वरुपातही कार्य करते. यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते आणि तुमची त्वचा सैल देखील होणार नाही. सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही आपल्या त्वचेचे संरक्षण होते. सकाळी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत मिळते.
मुलतानी मातीला आयुर्वेदिक उपचारांमध्ये भरपूर महत्त्व आहे. आयुर्वेदिक उपचार म्हणून त्वचेवर मुलतानी माती लावण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. सकाळच्या सुमारास चेहरा स्वच्छ धुऊन तुम्ही मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. मुलतानी मातीतील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील सर्व प्रकारची दुर्गंध, धूळ, मातीचे कण स्वच्छ होण्यास मदत मिळेल. शिवाय चेहऱ्याचा रंग आणि पोत देखील चांगला राहण्यास मदत मिळेल. या मातीमुळे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स देखील कमी होतील
चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे सनस्‍क्रीन लावणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर, मानेवर, हात आणि पायांवरही सनस्‍क्रीन लावावे. सनस्क्रीनमुळे वृद्धत्वाची लक्षणे, चेहऱ्यावरील डाग आणि टॅनिंग सारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सनस्क्रीनचा वापर करावा.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त