All Photo Freepik
फोटो

आहारात करा 'या' अन्नपदार्थांचा समावेश; Vitamin B12 ची कमतरता होईल पूर्ण

Kkhushi Niramish
सध्या Vitamin B12 ची कमतरता होणे हे खूप सामान्य झाले आहे. विशेष करून शाकाहारी लोकांना Vitamin B12 ची कमतरता जाणवते. जाणून घ्या कोणत्या अन्नपदार्थ आहेत Vitamin B12 चे स्रोत. यामध्ये गायीच्या दुधातून Vitamin B12 मोठ्या प्रमाणात मिळते. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांमधूनही Vitamin B12 मिळते.
दही हे Vitamin B12 चे एक प्रमुख स्रोत आहे. कमी फॅट असलेले दही हे Vitamin B12 ची १६ टक्के मात्रा पूर्ण करते. याशिवाय दह्यात जवस, यीस्ट इत्यादी गोष्टी मिसळून खाल्ल्याने Vitamin B12 चा 'बूस्टर डोस' मिळतो. वाचा अधिक - https://marathi.freepressjournal.in/lifestyle/by-mixing-this-food-with-curd-you-will-get-a-booster-dose-of-vitamin-b12
सोया दूधमधून Vitamin B12 मिळते. आजकाल अनेक जण प्राण्यांच्या होणाऱ्या शोषणामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नाकारतात. त्यांच्यासाठी सोया दूध हा एक उत्तम पर्याय आहे.
सोयाबिनच्या दुधाप्रमाणेच सोया चंक्समधूनही Vitamin B12 ची उणीव भरून काढता येते. याशिवाय यात प्रोटिनचाही मोठा स्रोत मिळतो.
पौष्टिक यिस्ट हे दह्यात मिसळून खाल्ल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात Vitamin B12 ची कमतरता पूर्ण होते.
ओट्स हे एक असे धान्य आहे जे तुम्ही सकाळ दुधासह नाश्त्याला खाऊ शकता. गायीचे दूध हे Vitamin B12 चे प्रमुख स्रोत आहे. यामध्ये ओट्स एकत्र करून खाल्ल्याने Vitamin B12 चा बूस्टर डोस मिळेल.
ब्रोकोली सकाळच्या नाश्त्यात खाल्ली जाते. याशिवाय याची भाजी देखील बनवतात. ब्रोकोलीतून Vitamin B12 सह हिमोग्लोबिनही वाढवते.
मशरूम हे आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा खजाना आहे. मशरूम खाल्ल्याने Vitamin B12 सह प्रोटीन, कॅल्शिअम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात मिळते.
बीटरूट हे Vitamin B12 भांडार म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये लोह आणि फॉलिक अॅसिडही असतात. आहारात सॅलडमध्ये बीटरुटचा समावेश असायला हवा. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत