फोटो

IPL 2025 : आजचे डूडल पाहिले? बघा आज सुरु होणाऱ्या IPL साठी गुगलचे खास डूडल

१८ व्या पर्वातील आजच्या सलामीच्या सामन्यासाठी गुगलने कोलकाता नाइट रायडर्सआणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुर यांच्या सामन्याचे खास थीम तयार केले आहे.

Krantee V. Kale

गुगल डूडल म्हणजे काय? आजचे डूडल पाहिले? आजचे डूडल काय आहे? एकदा नक्की वाचा
गुगल डूडल हे गुगलच्या होम पेजवर दर्शवल्या जाणाऱ्या विशिष्ट कला आणि चित्रांचा एक भाग आहे, जे विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा महत्त्वाच्या घटनांचा उत्सव साजरा करण्यासाठी वापरले जाते. हे डूडल्स विविध विषयांवर आधारित असतात, जसे की प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा जन्मदिवस, ऐतिहासिक घटना, महत्त्वपूर्ण दिवस किंवा उत्सव. गुगल डूडल्सचा उद्देश लोकांना विविध विषयांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करणे आणि इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक आणि स्थानिक महत्त्वाच्या घटना अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.

डूडल्समध्ये कला, अॅनिमेशन, संगीत, किंवा खेळ यांचा समावेश असतो. उदा, एका प्रसिद्ध व्यक्तीच्या जन्मदिवशी त्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित डूडल तयार केला जातो, किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेला दर्शवणारे डूडल तयार केले जाते. गुगल डूडल्सच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिले जातात. प्रत्येक डूडल एक छोटे परंतु प्रभावी संदेश देण्यासाठी डिझाइन केले जाते. यामुळे, गुगल डूडल्स फक्त मनोरंजनाचे साधन नाही, तर ते शिक्षण, प्रेरणा आणि जागरूकतेसाठी एक प्रभावी माध्यम बनले आहे.

कुठे दिसतो डूडल?

होमपेजवर आपण ज्या ठिकाणी सर्च करतो त्याच्या वरच्या बाजूला महत्त्वाच्या दिवशी एखादी थीम किंवा फोटो दिसत असेल त्याला गूगल डूडल असे म्हणतात.

काय आहे आजचे डूडल?

आज, 22 मार्च २०२५ भारत आणि जगभरातील क्रिकेट प्रेमींचा सण म्हणजेच आयपीएल २०२५ च्या १८ व्या पर्वाला आज सुरवात होत आहे. २०२५ च्या टाटा आयपीएलसाठी गुगल ने क्रिकेटचे खास डुडल बनवले आहे. १८ व्या पर्वातील आजच्या सलामीच्या सामन्यासाठी गुगलने कोलकाता नाइट रायडर्सआणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुर यांच्या सामन्याचे खास थीम तयार केले आहे.

गुगलच्या मुख्य पेजवर जाऊन तुम्ही आजच्या डूडलची माहिती जाणून घेऊ शकता.

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

"कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल"; आधी टॅरिफचा तडाखा, आता ट्रम्प यांना पाकचा पुळका; भारताला थेट डिवचलं

IND vs ENG : आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व; कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य