(सर्व छायाचित्रे: INSTAGRAM)
फोटो

माधुरी दीक्षितचा रॉयल साडी लूक व्हायरल; ओडिशा सिल्कमध्ये पारंपरिक सौंदर्याची झलक, पाहा Photos

माधुरी दीक्षितचा लेटेस्ट साडी लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. ओडिशा सिल्क साडीत तिने पारंपरिक आणि एलिगंट स्टाईल साकारत हातमाग परंपरेला नवा ग्लॅमरस टच दिला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

स्टाईल आणि परंपरेचा सुंदर संगम घडवण्यात जिचा हातखंडा आहे, अशा माधुरी दीक्षितचा प्रत्येक लूक नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नव्या साडी लूकने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या वेळी तिच्या लूकमधून ओडिशाच्या समृद्ध हातमाग परंपरेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

या खास लूकसाठी माधुरीने ओडिशातील पारंपरिक रेशीम साडीची निवड केली आहे. रॉयल ब्लू आणि फ्युशिया (गुलाबी आणि जांभळा मिश्रित) या रंगांच्या आकर्षक संगमामुळे साडीला उठावदार आणि शाही लूक मिळाला आहे. गडद निळ्या साडीवर शंख, चक्र आणि नाजूक फुलांची नक्षी उठून दिसते.

माधुरीने या साडीसोबत दागिन्यांमध्ये खास स्टेटमेंट स्टाईल निवडली आहे. मोठे लॉकेट असलेली सोन्याची लेयर्ड माळ, झुमके आणि हातात २ गोल्डन बांगड्या यामुळे लूकला पारंपरिक आणि आकर्षक टच मिळाला आहे. यासोबतच, तिने एक गोल्डन अंगठी पण घातली आहे.

फ्युशिया रंगाच्या बॉर्डरमुळे साडीला सुंदर कॉन्ट्रास्ट मिळतो. मंदिर शैलीतील डिझाईन आणि बारकाईने केलेले जरीकाम यामुळे साडीची शोभा आणखी वाढते. माधुरीने या साडीसोबत फ्युशिया रंगाचा सिल्क ब्लाऊज परिधान केला आहे. गोल गळा आणि कोपरापर्यंतच्या बाह्यांमुळे तिचा लूक क्लासिक दिसतो.

पदरावरील नाजूक नक्षीकाम साडीला पारंपरिक वारशाचा स्पर्श देतं. हा लूक साधेपणाऐवजी समृद्धतेचा स्वीकार करत भारतीय वस्त्रपरंपरेची भव्यता अधोरेखित करतो.

हा लूक केवळ फॅशनपुरता मर्यादित नसून हातमाग उद्योगाच्या नव्या स्टाईलचा संदेश देतो. 'बोयानिका'सारख्या ब्रँडची निवड करून माधुरीने प्रादेशिक कारागिरांच्या कलेला व्यासपीठ मिळवून दिलं आहे.

मेकअपमध्येही माधुरीने साधेपणा आणि आकर्षणपणा यांचा समतोल साधला आहे. हलका स्मोकी आय मेकअप, गुलाबी लिपस्टिक आणि कपाळावरची लाल बिंदी तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतेय. केसांचा साधा अंबाडा केल्यामुळे साडीची रंगसंगती आणि नक्षीकाम अधिक ठळकपणे दिसून येते.

परंपरागत वस्त्रकला ही केवळ भूतकाळाचा भाग नसून आजही जिवंत आणि विकसित होणारी कला आहे, याची आठवण तिच्या या लूकमधून होते.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग