मकर संक्रांत अगदी काही दिवसांवर आली आहे. मकर संक्रांत आली म्हटल्यावर महिलांची लगबग ही साडी, वाण खरेदीसाठी सुरू होते. मग अश्यात प्रश्न पडतो, या वर्षी वाणात आपण काय वेगळं आणि हटके देऊ शकतो ? मग, आपल्यासाठी हे काही पर्याय आहेत. ज्यामुळे तुम्ही वेगळी आणि हटके संक्रात करू शकता. 
फोटो

मकर संक्रांतीला काय वाण द्यायचं ठरवलंय? स्वस्तात मस्त अन् हटके...सुवासिनींसाठी उपयोगी वाण, वाचा डिटेल्स

यावर्षी वाणात आपण काय वेगळं आणि हटके देऊ शकतो ? मग, आपल्यासाठी हे काही पर्याय आहेत. ज्यामुळे तुम्ही वेगळी आणि हटके संक्रात करू शकता.

Swapnil S
आरसा- आरसा हे सौंदर्याचं प्रतिक आहे. या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असा साजश्रृंगार महिला करतात. प्रवासात किंवा ट्रिपला गेल्यावर महिलांना आवर्जून लागणारी गोष्ट असते ती म्हणजे आरसा, यामुळे सुवासिनींना वाण म्हणून तुम्ही आरसा भेट देऊ शकतात.
हिरव्या बांगड्या- बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात, आपल्या संस्कृतीत देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो. म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकतात.
कुंकूपाळ- लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्यालंकार मानला आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण असतं यामुळे, सुवासिनींना वाण म्हणून कुंकवाची डबी किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरेल. वर्षभर उपयोगात येईल.
तुळशी रोप- अंगणातली तूळस लक्ष्मीचे रुप मानले जाते, तुळस वातावरण प्रसन्न ठेवण्याच काम करते. त्यामुळे तुम्ही वाणात महीलांना तुळशीचे रोप देऊ शकता.
हातरूमाल- महिलांचा रोजच्या वापरात हातरूमाल हा असतोच. वाणातील एक पर्याय म्हणून तुम्ही हातरूमाल देऊ शकता.

सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते, विरोधकांची १४ मते फुटली

नेपाळमध्ये आगडोंब! संसद, राष्ट्रपती भवन आणि मंत्र्यांची घरे जाळली

'सोन्याचा भडका'; १० ग्रॅम सोने १.१२ लाखांवर, दिवसभरात दरात ५,०८० रुपयांनी वाढ

सियाचीनमध्ये हिमस्खलनात लष्करातील ३ जवान शहीद; अनेक जण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू

राष्ट्रपती, राज्यपाल केवळ नामधारी प्रमुख; कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडले मत, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणे बंधनकारक!