All photo nandiniguptaa13 Instagram
Miss World 2025 ची स्पर्धा यंदा तेलंगणा येथे पार पडणार आहे. ही ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत मिस इंडिया 2023 नंदिनी गुप्ता ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या फेमिना मिस वर्ल्ड २०२३ कार्यक्रमात तिला मिस वर्ल्ड इंडियाचा किताब देण्यात आला. जाणून घ्या तिच्याबद्दलची माहितीनंदिनी गुप्ताचा जन्म २००४ मध्ये राजस्थानमधील कोटा येथे झाला. तिला वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मिस इंडिया व्हायचे होते. ती प्रियांका चोप्रा हिला आपला आदर्श मानते. वयाच्या १९ व्या वर्षी मिस तिने मिस इंडिया मिस वर्ल्डचा किताब जिंकला. माहितीनुसार, ती मुंबईतील लालालजपतराय कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेत आहे. मिस इंडिया स्पर्धेत तिला प्रश्न विचारण्यात आला होता की ती जग बदलेल की स्वतःला बदलेल?यावर तिने आधी स्वतःत बदल करणे महत्त्वाचे आहे चॅरिटी बिगिन्स अॅट होम असे म्हणतात. त्यामुळे आधी स्वतःत बदल करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमच्यात स्वतःत बदल करण्याची शक्ती असते तेव्हा तुम्ही जग बदलू शकता. तिच्या उत्तराने परिक्षकांसह इतर सर्वांवरच खूप प्रभाव टाकला आणि तिने मिस वर्ल्ड मिस इंडिया २०२३ चा किताब जिंकला.स्पर्धेवेळी नंदिनी गुप्ता हिने ती रतना टाटा यांच्या आयुष्याने
प्रेरित आणि प्रभावित आहे, असे म्हटले होते. राजस्थानची कोटा येथील नंदिनी गुप्ता ही मिस वर्ल्ड 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्ज आहे. भारत तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करत असून यापूर्वी भारताने १९९६ मध्ये बंगळुरू येथे तर २०२४ मध्ये मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केले होते. तर यंदा तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन हैदराबाद येथे करण्यात येत आहे.