फोटो

Narali Purnima 2026 Wishes : नारळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! प्रियजनांसोबत शेअर करा मराठी Quotes आणि HD कार्ड्स

नारळी पौर्णिमा २०२६ निमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश, Quotes आणि आकर्षक ग्रीटिंग कार्ड्स. कार्ड्स मोफत डाउनलोड करून WhatsApp, Instagram आणि Facebook वर शेअर करा.

Mayuri Gawade

नारळी पौर्णिमा हा समुद्र आणि निसर्गाशी जोडलेला पारंपरिक सण आहे. या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. मच्छीमार बांधवांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असून, समुद्र शांत राहावा आणि सुरक्षित मासेमारी करता यावी, अशी प्रार्थना केली जाते.

यंदा आज, २८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा साजरी केली जात आहे. या खास सणानिमित्त तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर मराठी शुभेच्छा संदेश आणि आकर्षक ग्रीटिंग कार्ड्स. ही कार्ड्स तुम्ही मुफ्त डाउनलोड करून WhatsApp, Instagram आणि Facebook वर शेअर करू शकता. मग आजच्या दिवशी तुमच्या आप्तस्वकीयांना पाठवा नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

समुद्रदेवाला अर्पण करूया नारळ भक्तिभावाने,
नारळी पौर्णिमेचा सण साजरा करूया आनंदाने,
आयुष्य भरभराटीने आणि सुख-समृद्धीने फुलो!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळी पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात,
नात्यांमध्ये प्रेमाचा गोडवा वाढत राहो,
आयुष्यात सुख-समृद्धी सदैव नांदो!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळी पौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त,
आनंद, समाधान आणि सुख लाभो अनंत,
तुमच्या आयुष्यात सुखाची बरसात होवो!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळी पौर्णिमेच्या शुभदिनी,
प्रत्येक स्वप्नाला यशाची नवी दिशा मिळो,
आयुष्यात सुख-शांती आणि समृद्धी नांदो!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

समुद्राच्या लाटांसारखा आनंद आयुष्यात येवो,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छांनी प्रत्येक क्षण खुलो,
सुख-समृद्धीने तुमचं जीवन सदैव भरून जावो!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळाच्या गोडव्याप्रमाणे नात्यांमध्ये गोडवा राहो,
समुद्राच्या अथांगतेसारखं प्रेम मनात राहो,
आयुष्य आनंदाने फुलत राहो!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळी पौर्णिमेचा सण घेऊन येवो नवी उमेद,
प्रत्येक दिवसात लाभो आनंदाची साथ,
सुख-समृद्धीने उजळून निघो जीवनाची वाट!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळी पौर्णिमेच्या मंगल पर्वावर,
सुख, शांती आणि समृद्धी लाभो भरभरून,
आयुष्यातील प्रत्येक क्षण जावो आनंदाने फुलून!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

समुद्रदेवाच्या चरणी अर्पण करूया नारळ,
मनात ठेवूया श्रद्धा आणि आनंदाचा सोहळा,
सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान नांदो!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळी पौर्णिमेचा सण घेऊन येवो आनंदाची लहर,
प्रेम, आपुलकी आणि सुखाने भरून जावो घर,
तुमच्या आयुष्यात सदैव राहो आनंदाचा सागर!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राच्या प्रश्नांना द्वेषपूर्ण सरकारी उत्तर

Raksha Bandhan 2026 Wishes : राखीच्या धाग्यात प्रेमाची वीण! भावा-बहिणीला पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश आणि आकर्षक कार्डस्

Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधनाचे ३ शुभ मुहूर्त! जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ आणि पूजा पद्धत

नारळी पौर्णिमेला असा बनवा खमंग नारळी भात; सुटसुटीत होण्यासाठी 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा

आजचे राशिभविष्य, २८ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत