स्टायलिश लूक, आलिशान सजावट अन् कुटुंबीयांची साथ; नेहा कक्करचा ३८वा वाढदिवस साजरा, पार्टीतील फोटो व्हायरल  (Photos -Instagram/@nehakakkar)
फोटो

स्टायलिश लूक, आलिशान सजावट अन् कुटुंबीयांची साथ; नेहा कक्करचा ३८वा वाढदिवस साजरा, पार्टीतील फोटो व्हायरल

समोर आलेल्या फोटोंमध्ये नेहा आणि तिचा नवरा रोहनप्रीत सिंग रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

किशोरी घायवट-उबाळे
लोकप्रिय गायिका नेहा कक्करने तिचा ३८वा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला.
पती रोहनप्रीत सिंग, कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत नेहाने हा दिवस एन्जॉय केला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेहाने वाढदिवसासाठी ब्लॅक ऑफ-शोल्डर टॉपसोबत व्हाईट स्कर्ट परिधान केला होता. या ब्लॅक-अँड-व्हाईट लूकमध्ये ती अत्यंत स्टायलिश आणि एलिगंट दिसत होती. वाढदिवसाचा केक कापताना आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना नेहा खूप आनंदी दिसत होती.
समोर आलेल्या फोटोंमध्ये नेहा आणि तिचा नवरा रोहनप्रीत सिंग रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
वाढदिवसाच्या सजावटीसमोर उभे राहून या दोघांनी खास पोझ दिल्या. चाहत्यांकडून या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
नेहाने बहीण सोनू कक्कर आणि आई-वडिलांसोबतही स्पेशल क्षण साजरे केले.
एका फोटोत ती कुटुंबीयांना केक भरवताना दिसत आहे.
मित्रमैत्रिणींसोबतचा तिचा ग्रुप फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
वाढदिवसाच्या पार्टीची सजावटही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
"हॅपी बर्थडे" निऑन साइन, गोल्डन आणि व्हाईट बलून्स, फुलांची सजावट आणि लाल मेणबत्त्यांमुळे संपूर्ण सेटअपला आलिशान लूक मिळाला होता.
नेहा कक्करने तिच्या करिअरची सुरुवात 'इंडियन आयडल' या रिॲलिटी शोमधून केली होती. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट गाणी दिली.
पार्श्वगायनासोबतच ती अनेक रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही झळकली आहे.

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू