केस फ्रिझी झाले की तुटणे आणि गळणे सुरू होते. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. Freepik
दमट हवामान, हार्मोनल बदल, प्रदूषण, धूळ आणि घाम, या गोष्टींमुळे केस कमजोर होऊ लागतात. आपल्या केसांनाची नैसर्गिक चमक पुन्हा मिळवण्यासाठी, स्टेप बाय स्टेप केसांची काळजी घ्या.आठवड्यातून दोनदा खोबरेल किंवा आर्गन ऑइलसारखे तेल केसांच्या मुळांमध्ये लावा आणि मसाज करा.तुमच्या केसांसाठी नेहमी सल्फेट, पॅराबेन फ्री शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. आवश्यक असेल तेव्हाच केस धुवा. केसांना पोषण देण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा हेअर मास्क लावा. केसांना चमक आणि मुलायमपणा आणण्यासाठी हेअर सीरम वापरा. केस धुतल्यानंतर आणि कंडिशनिंग केल्यानंतर ते लावा.