फोटो

"पोरं मामाच्या गावी जातात, ही आत्तूच्या शहरी..."; प्राजक्ता माळीची कुटुंबासोबत राणीच्या बागेत धमाल, Photos

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेला भेट दिली.

Mayuri Gawade

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये झळकली होती.

आंतरराष्ट्रीय मंचावर मराठीचा झेंडा फडकावल्यानंतर आता ती कुटुंबासोबत मुंबईतील खास ठिकाणांना भेट देत सुट्टीचा आनंद घेत आहे.

भायखळ्यातील ऐतिहासिक ‘राणीची बाग’ पाहण्यासाठी प्राजक्ताने आपल्या कुटुंबासह खास भेट दिली.

पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी प्राजक्ता खऱ्या आयुष्यात मात्र कुटुंबाशी घट्ट नातं जपताना दिसते.

“उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं मामाच्या गावी जातात, ही आत्तूच्या शहरी येतात...” असे भन्नाट कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले.

प्राणी, दुर्मिळ पक्षी आणि हिरवाईने नटलेली राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानली जाते. दररोज हजारो पर्यटक भेट देतात.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्राजक्ता तिच्या कामासोबतच कुटुंबासोबत घालवलेले खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते.

व्यस्त शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढत कुटुंबासोबत घालवलेले हे निवांत क्षण सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Mumbai: नियम पाळले जात असल्याची खात्री करा! बांधकाम ध्वनिप्रदूषणासंदर्भात पालिकेला निर्देश

Mumbai: जीएलएमआरसह तीन प्रकल्पांसाठी झाडांचा बळी; ११ झाडांचे पुनर्रोपण प्रस्तावित, नागरिकांना सात दिवसांत हरकती सूचना नोंदवा

ट्रम्प करतात मोदींना नियंत्रित; राहुल गांधींनी केला दावा, पुन्हा दिले चर्चेचे आव्हान

लासलगाव बाजार समितीत मक्याला दहा वर्षांतील उच्चांकी भाव; प्रतिक्विंटल ३ हजारांचा टप्पा पार!

दंड थकवणाऱ्यांना 'अभय'; दंडावर २० टक्के सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय