मेकअप काढताना सौम्य माईसिलर वॉटर किंवा मेकअप रिमूव्हर वापरा. ते त्वचेला हानी न करता मेकअप काढते.चेहरा धुताना नेहमी कोमट पाणी वापरा. गरम पाणी त्वचा सुकवू शकते आणि थंड पाणी चेहऱ्याला हानी पोहोचवू शकते. कोमट पाणी त्वचेसाठी योग्य असते.
त्वचेच्या प्रकारानुसार हलका आणि सौम्य फेस वॉश किंवा क्लिंझर वापरा. केमिकल्स असलेल्या उत्पादांपासून दूर रहा.चेहरा धुताना जास्त घासू नका. हलक्या हाताने त्वचेला मसाज करा, कारण जास्त घासल्यामुळे त्वचा खूप कोरडी होऊ शकते.चेहरा धुतल्यानंतर अतिरिक्त मृत त्वचा काढण्यासाठी एक्सफोलिएटर वापरा. पण हे आठवड्यातुन एक किंवा दोन वेळाच करा.
आपल्या चेहऱ्याला दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी धुवा. त्यामुळे चेहरा स्वच्छ राहील आणि धुळीपासून बचाव होईल.चेहरा धुतल्यानंतर हलक्या आणि सुती कपड्याने पुसा. जास्त रगडू नका. कारण त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.चेहरा धुण्यासाठी तुमच्या त्वचेनुसार योग्य ते फेस वॉश अथवा क्लिंजिग वापरा.
चेहरा धुतल्यानंतर त्वचा मऊ ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )